मुंबईतील कलिनामध्ये आरटीआय कार्यकर्त्याची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 16 Oct 2016 05:16 PM (IST)
मुंबई: मुंबईतील कलिनामध्ये 72 वर्षीय आरटीआय कार्यकर्त्याची घरात घुसून गोळी झाडून हत्या करण्यात आली. ही हत्या भू-माफियानं केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सकाळी साडेनऊ वाजता आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या राहत्या घरी घुसून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हत्येचं कारण अस्पष्ट असून मारेकऱ्यांना तातडीनं अटक करण्यात यावी अशी मागणी कलिनातील रहिवाशांनी केली आहे. दरम्यान, याविरोधात कलिना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.