Coronavirus In Mumbai: मुबंईत गेल्या 24 तासात 60 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर, सलग दुसऱ्या दिवशी एकाही मृत्युची नोंद नाही. ही मुंबईकरांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे. मुंबईत सध्या 467 रुग्ण सक्रीय आहेत. तर, शहरातील रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहचला आहे.
मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, शहरात आज 60 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आलीय. ज्यामुळं मुंबईतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाख 57 हजार झालीय. यापैकी 16 हजार 692 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर, 7 लाख 41 हजार 595 जणांनी कोरोनावर मात केलीय. मुबंईत संध्या 467 रुग्ण सक्रीय आहेत. तर, शहरातील रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहचला आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 7 हजार 56 दिवसांवर गेलाय.
मुंबई महानगरपालिकेचं ट्वीट-
राज्यात आज 460 रुग्णांची नोंद, पाच जणांचा मृत्यू
राज्यात आज 460 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर, पाच जणांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागलाय. राज्यात सोमवारी कोरोनामुळं एकही मृत्यू झालेला नव्हता. राज्यात गेल्या 24 तासात 718 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या 3 हजार 209 सक्रीय रुग्ण आहेत. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यामध्ये आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये 1 हजार 187 सक्रीय रुग्ण आहे. तर, मुंबईत 467 रुग्णावर उपचार सुरु आहेत.
हे देखील वाचा-
- Coronavirus Cases Today : देशात कोरोना रुग्णांमध्ये घट, कोरोनाबळी वाढले; गेल्या 24 तासात 3993 नवे रुग्ण
- Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी कोरोनाबाधितांमध्ये घट, आठवड्यात दुसऱ्यांदा शून्य कोरोना मृत्यूची नोंद
- Maharashtra Unlock Guidelines : ठाणे ,नवी मुंबईत कोरोना निर्बंध शिथिल; सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha