मुंबई : मुंबईच्या मालाड परिसरात नेव्ही भरतीआधी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेकर परीक्षार्थी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल 10 हजारांहून अधिक तरुण भरतीसाठी इथे आले होते. मात्र यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. आपला जीव वाचवण्यासाठी परीक्षार्थी धावपळ करत होते. यात अनेक तरुण दबल्याने जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून हजारो तरुण मालाडच्या मार्वेमध्ये असलेल्या 'आयएनएस हमला'मध्ये भरतीसाठी आले आहेत. पण इथे खाण्या-पिण्याचीच नाही तर बसण्याचीही व्यवस्था नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. पाहतापाहता तिथे चेंगराचेंगरी झाली, ज्यात अनेक तरुण जखमी झाले.
आयएनएल हमला हे मुंबई समुद्रकिनाऱ्यावर सैन्यदलाचं तळ आहे.