रात्री 11.58 मिनिटांनी चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने पहिली लोकल धावली.
दुसरीकडे (बुधवारी) पुन्हा मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उद्या पुन्हा आजसारखा पावसाचा जोर राहिल्यास मोठ्या खोळंब्याला तोंड द्यावं लागणार आहे.
तुम्ही मुंबईबाहेर पडण्याचा बेत आखला असेल तर तोही तुम्हाला रद्द करावा लागणार आहे. कारण मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक हे दोन्ही महामार्ग खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्या मुंबईत दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.
30 हजार कर्मचारी कार्यालयात अडकले
मुसळधार पावसामुळे ऑफिसमध्ये गेलेल्या कर्मचाऱ्यांचा खोळंबा झाला आहे. जवळपास 30 हजार जण कार्यालयांतच अडकले आहेत.
मुंबईत कुठे कुठे जेवण-खाण्याची आणि राहण्याची सोय
दादर, प्रभादेवी : सिद्धीविनायक मंदिर
अंधेरी : अंधेरी स्पोर्ट्स कॉम्लेक्स
मुलुंड : कालिदास नाट्यगृह
सीएसएमटी : बाई काबीबाई शाळा
ताडदेव : तुलसीवाडी गणेशोत्सव मंडळ मंडप
दादर, माटुंगा, सायन, परेल : जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव, वडाळा. श्री हरजी बोजराज अँड सन्स. के व्ही ओ जैन छत्रालय श्रद्धानंद आश्रम रोड, माटुंगा
सायन/दादर : शगुन हॉल, लक्ष्मी नारायण लेन, माटुंगा. दादर गुरुद्वारा, चित्रा सिनेमासमोर
माटुंगा : एचएनआर टेक प्रायव्हेट लिमिटेड, पहिला मजला, भानुज्योती बिल्डिंग, एल एन रोड, माटुंगा मध्य रेल्वे स्टेशनसमोर
घाटकोपर पूर्व : गणेश प्रिमियम टी पी एल, 103 नीलयोग स्क्वेअर, घाटकोपर रेल्वे स्टेशनसमोर
वांद्रे, खार, सांताक्रूझ, माहिम सी लिकं : तिरुपती भवन, लिंकिंग रोड, अमरसन्सजवळ
मस्जिद बंदर : महाजनवाडी
चर्चगेट फोर्ट, सीएसटी : बालवीर सार्वजनिक गणेशोत्सव, डी एन रोड
मालाड पश्चिम, अंधेरी पूर्, सांताक्रूझ पूर्व, मढ आयलंड : रक्षा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
ठाणे : ए वन कॅटरर्स,रेल्वे हॉल, ठाणे स्टेशन जवळ
मुंबईत येणारे महामार्ग रोखले
- मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कुसगाव, उर्से टोलनाक्याजवळ रोखली
- जुना हायवे NH 4 पण बंद
- नाशिककडून मुंबईला येणारी वाहतूक घोटी टोल नाक्याजवळ थांबवली
रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प
रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या तीनही मार्ग ठप्प झाले आहेत. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील ट्रॅकवर पाणी आलं आहे.
मध्य रेल्वेवर तर पुढील सूचना येईपर्यंत कोणत्याही दिशेला लोकल सुटणार नाही, अशी अनाऊन्समेंट दुपारी झाली, त्यानंतर संध्याकाळपर्यंत एकही सूचना दिली नाही.
तर हार्बर मार्गावर तर सीएसटीकडे निघालेली लोकल वाशीजवळ तासभर रखडली. त्यानंतर तीच लोकल पुन्हा मागे पनवेलला नेण्यात आली. याशिवाय पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे स्टेशनवर पाणी आलंच शिवाय तांत्रिक बिघाडही झाला. त्यामुळे तीनही रेल्वे मार्ग बंद झाले आहेत.
अनेक ठिकाणी लोकल जिथल्या तिथे थांबल्यामुळे लोकांना लोकमधून उतरुन कमरेपर्यंतच्या पाण्यात चालत यावं लागलं. अनेक किमीचं अंतर पाण्यातून पायी करावं लागलं.
सायन, परळ आणि कुर्ला स्थानकांच्या रुळांवर पाणी साचलं आहे.
मोदीचं मदतीचं आश्वासन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत केली. मुंबई आणि परिसरात अखंड कोसळणाऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली. राज्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारला लागेल ती, सर्वतोपरी मदत करण्याची हमी केंद्र सरकार देतं. मुंबई आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित राहावं. जोरदार पावसात आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करतो, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं.
मुख्यमंत्र्यांचं आवाहन
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या नैसर्गिक आपत्तीनंतर तातडीने आपत्ती निवारण कक्षात धाव घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांशी बातचित करुन परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
बुधवारी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी
दरम्यान आजच्या तुफान पावसामुळे मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.
मुंबईतील पावसाची आकडेवारी -
परिसर- गेले 24 तास/ गेला एक तास
- अंधेरी – 270 मिमी/ 92 मिमी
- बीकेसी – 204 मिमी/ 54 मिमी
- वांद्रे पश्चिम – 247 मिमी/ 52 मिमी
- भांडुप – 251 मिमी/ 58 मिमी
- चेंबुर – 214 मिमी/ 62 मिमी
- कफ परेड – 123 मिमी/ 10 मिमी
- दहिसर – 190 मिमी/ 40 मिमी
- घाटकोपर पूर्व – 221 मिमी/ 61 मिमी
- गोरेगाव – 193 मिमी/ 65 मिमी
- परळ – 285 मिमी/ 40 मिमी
- कुर्ला – 300 मिमी/ 92 मिमी
संबंधित बातम्या
मुंबईतील पाऊस आणि 20 मोठे मुद्दे
मार्ग बंद, वीज गायब, तुफान पाऊस, दिवसभरात मुंबईत काय घडलं?
लोकल ठप्प, संधीचा फायदा घेत टॅक्सी, रिक्षावाल्यांकडून सर्रास लूटमार
LIVE : दादर, सायन, परळ भागात वीजपुरवठा खंडित
LIVE- पाऊस : मुंबई एण्ट्री पॉईंटवरील टोलवसुली बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली : महापौर
स्टेशनवर अडकला आहात? मुंबईतील या मार्गांवर बेस्टकडून अतिरिक्त बस
मुंबईत गेल्या एका तासात कुठे किती पाऊस? विभागनिहाय आकडेवारी
उभ्या पावसात पोलिसांचं काम पाहा, एक कडक सॅल्युट ठोकाल!
मुंबईत 'पाऊस'फुल्ल, 'या' रस्त्यांवरुन जाणं टाळा
पाऊस अपडेट : राज्यात कुठे-कुठे पावसाची हजेरी?
संबंधित फोटो फीचर
दादरच्या फूलमार्केटमध्ये पाणीच पाणी, गुडघाभर पाण्यात फुलं आणि हार
मुंबईत तुफान पाऊस, अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी
पाऊस अपडेट : राज्यात कुठे-कुठे पावसाची हजेरी?