- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Mumbai Rains Live Updates: मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल ट्रेनची वाहतूक पूर्वपदावर, हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट कायम
Mumbai Rain Live updates Today : मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकल ट्रेन आणि मोनो रेलच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. काल रात्रीपर्यंत लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत होती.
पार्श्वभूमी
Heavy Rain in Mumbai Today Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तुफान पाऊस सुरु आहे. बुधवारी हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली...More
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर मुसळधार पावसामुळे उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा महामार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या नदीवर नव्याने पूल उभारण्याचे काम सुरू असून, त्या ठिकाणी तब्बल 30 कामगार अडकले होते. स्थानिकांच्या मदतीने या सर्व कामगारांना सुरक्षित स्थळी हलवले.
पाणी पातळीत वाढ झाल्याने हतनूर धरणाचे 41 पैकी 24 दरवाजे उघडल्याने तापी नदीला पूर....
नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा या मध्यम प्रकल्प बॅरेज मधून तापी नदीत 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू....
प्रकाशा आणि सारंगखेडा तापी नदीच्या काठावरील 33 गावांना सतर्कतेचा इशारा....
प्रकाशा बॅरेज चे 6 दरवाजे उघडले पूर्ण क्षमतेने.....
संभाव्य धोके टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन...
धरणातून तापी नदीत पत्रात 1 लाख 57 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू....
मराठवाड्यात दोन दिवसांत कुठेही अतिवृष्टी नाही, पंचनामे सुरू, नुकसान झालेल्या ठिकाणी आता पंचनामे सुरू झाले आहे.
आतापर्यंत 14 मृत्यू झाले आहेत.
परभणी जिल्ह्यात दोन जण वाहून गेले, अशी आत्ताच माहिती समोर आली आहे.
विभागातील सर्वच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे
चिखल असल्याने पंचनामे करण्यासाठी अडचणी येत आहे.
मागील ५ दिवसांत राज्यातील धरणसाठा जवळपास १२ टक्क्यांनी वाढला आहे.
राज्यातील धरणसाठा ८१ टक्क्यांवर पोहोचला, ५ दिवसांआधी हाच साठा जवळपास ६९ टक्क्यांवर होता
मात्र, मागील काही दिवसांत झालेल्या धुंवाधार पावसानंतर राज्यातील धरणांमधील पाणीपातळी वाढली
दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावात मिळून ९५ टक्के पाणीसाठा
तुलसी, विहार, मोडकसागर आणि तानसा १०० टक्के भरलं
भातसा ९३ टक्के, मध्य वैतरणा ९९ टक्के, अप्पर वैतरणा ९२ टक्के जलसाठा
कोकण विभागात सर्वाधिक ९१ टक्के पाणीसाठा
- पुणे ८९ टक्के
- नाशिक ७१ टक्के
- संभाजीनगर ७३ टक्के
- अमरावतीत ७९ टक्के
- नागपूर विभागात ६९ टक्के जलसाठा उपलब्ध
कोल्हापूर : गेल्या पाच दिवस कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीने आपली इशारा पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 40 फुटांवर जाऊन पोहोचली असून तिचे आता धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. पाणी पातळीमध्ये पंचगंगा नदीचे विस्तीर्ण आणि रौद्ररूप पाहायला मिळत आहे.
इगतपुरी : मुसळधार पावसामुळे वाघाचा झाप मेंगाळझाब कातोरे वस्ती व परिसर गेला पाण्याखाली जनजीवन विस्कळीत झाले, येथील रस्ते पाण्याखाली गेल्याने या आदिवासी पाड्यांचा शहराशी संपर्क तुटला आहे. विद्यार्थी आणि नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस सुरू असून प्रशासनाने अजून शाळांना सुट्टी जाहीर केली नाहीये.
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीच मोठ नुकसान झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे कृषिमंत्री वाशिमचे दत्तात्रय भरणे वाशीमच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भर पावसात दुचाकीबसून शेतकऱ्या बांधावर जाऊन अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी केली.
राज्यात अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे, यात सर्वाधिक नुकसान नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात झाला आहे. यात 350 गावांच नुकसान झाला आहे.4 लाख 11 हजार एकरच नुकसान झालं आहे. एक-दोन ठिकाणी मनुष्यहानी झाली आहे. हीच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ची पाहणी करण्यासाठी मी आज वाशिम जिल्ह्यात आलो आहे.
आज सर्वत्र नुकसानीची पाहणी करून याचा अहवाल मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्रीं यांना देणार आहे, त्यानंतर ते निर्णय घेऊन मदत देतील. केंद्र सरकारकडे सुद्धा शेतकऱ्यांना मदतीसाठी मागणी करणार आहे.
आज ते वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या रिसोड तालुक्यातील महागाव,बाळखेड, वाकद, शेलू खडसे, मसलापेन त्यानंतर मालेगाव तालुक्यातील राजुरा तर मंगरूळपीर तालुक्यात शेलूबाजार आणि वाशिम इथ भेट देत पाहणी केली आहे. त्यानंतर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात बैठक घेणार आहेत.
सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व धरणांमधील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे कोयना, कृष्णा, वेण्णा, तारळी नद्यांना पूर आला आहे... सातारा जिल्ह्यातील अनेक छोटे पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कराड तालुक्यातील तारवी नदी देखील दु थडी भरून वाहत आहे. सध्या पाट, सातारा महाबळेश्वर वाई येथील 350 हून अधिक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
मुंबईसह कोकणात कोसळणाऱ्या पावसामुळे कोकण रेल्वेला फटका, कोकणात येणाऱ्या अनेक गाड्या रद्द
मुंबई मडगाव अप डाऊन जनशताब्दी एक्सप्रेस दोन्ही गाड्या रद्द.
मुंबई ते मडगांव वंदे भारत एक्सप्रेस अप डाऊन दोन्ही रद्द.
कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना फटका
मुंबईतून गणेश चतुर्थी निमित्त येणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा.
कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या उशिराने देखील धावत आहेत.
वसई, विरार, नालासोपारामधील काही भाग १२ तासापासून पाण्याखाली आहे. तेथील विद्युत सप्लाय बंद असल्याने नागरीकांचे हाल बेहाल झाले आहेत. काल वसई विरार क्षेत्रात पावसाचं रौद्ररुप पाहायला मिळालं. संपूर्ण वसई विरार जलमय झालं होतं. अनेख सखल भागातील सोसायटीमध्ये पाणी जमा झाल्याने सोसायटीच्या मिटर बॉक्स पर्यंत पाणी गेले होते. त्यामुळे महावितरणाने खबरदारी घेत वीज सप्लाय बंद केला होता. ज्या सोसायटीचे पाणी उतरले तेथील ट्रान्सफार्म सुरु करण्यात आले. माञ अजही वसई विरार आणि नालासोपारातील काही भागातील पाणी ओसरलं नसल्याने लाईट नाही आहे.
जवळपास १२ तासापासून काही ठिकाणी लाईट नाही आहे. विरार येथील गोकुळ टाउनशिप, छेडा नगर, स्टेशन परिसर वसईतील स्टेशन परिसर तसेच माणिकपूर मधील काही भाग, नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसर, पश्चिमेतील श्रीप्रस्थ रोड, या ठिकाणी काल दुपारी ३ वाजल्यापासून वीज बंद करण्यात आली आहे. राञभर कोसळलेल्या पावसामुळे आताही सोसायटीमध्ये पाणी साचल्याने पाणी ओसरल्यावर तात्काळ वीज प्रवाह सुरु करण्यात येईल अशी माहीती महावितरणाचे अधिक्षक अभियंता संजय खंडारे यांनी दिली आहे.
खडकवासला धरणातून ३९ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे एकता नगर परिसरात पाण्याची पातळी वाढायला सुरूवात झाली आहे. नदी पात्रालगत असलेल्या मंदिरतील गणपतीची मूर्ती हलवण्यात येत आहे. सोबतच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
वसई-विरार : गेल्या चार दिवसांपासून वसई-विरार शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान नालासोपारा पूर्वेतील टाकी रोड, आपना नगर सोसायटी परिसरात पाण्यात मोठमोठे मासे दिसू लागले आहेत. इतकेच नव्हे तर कालपासून या परिसरात सापांचाही वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगली : शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे.
चांदोली धरणातील विसर्ग आणि पाऊस यामुळे शिराळा तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने पुलावरची वाहतूक बंद
चरण - सोंडोली पूल,
आरळा- शित्तुर पुल
बिळाशी- भेडसगाव पुल
मांगले- सावर्डे पुल
कांदे- सावर्डे- मांगले पुल
या गावाना जोडणारे पूल रात्रीपासून पाण्याखाली गेले आहेत, यामुळे या पुलावरची वाहतुक बंद केली आहे.
18 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीत हसनाळ या गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे खालील पाच जणांचा मृत्यू झालेला आहे.
1. पिराजी म्हैसाजी थोटवे वय 70
2. चंद्रकला विठ्ठल शिंदे वय 45
3. ललिताबाई भोसले वय 60
4. भीमाबाई हिरामण मादाळे वय 65
5. गंगाबाई गंगाराम मादाळे वय 65
वरील सर्वांचे मृतदेह सापडले आहेत.
मुखेड - उदगीर रस्त्यावरील धडकनाळ येथील पुलावरून एक कार आणि एक ऑटो मधील सात जण पुराच्या पाण्यात वाहून गेले होते यातील 03 जणांना वाचविण्यात उदगीर अग्निशमन दलाला यश आहे असून उर्वरित 04 बेपत्ता जणांपैकी 03 जणांचा मृतदेह सापडले आहेत.
वाचविण्यात आलेल्या व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे आहेत.
1. नारायण इबिते, गौडगाव कर्नाटक
2. आसिफ शेख, उदगीर
3. मोहम्मद शोएब, निझामाबाद
चार बेपत्ता व्यक्तींपैकी तीन व्यक्ती मयत झाले असून तिघांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत
1. समीना शेख वय 48 रा. जागतियाल, तेलंगाणा
2. हसीना शेख वय 29 जागतियाल, तेलंगाणा
3. महेबूब शेख रा. गवंडगाव ता. देगलूर
खालील एक महिला अजूनपर्यंत बेपत्ता असून तिचा शोध घेणे चालू आहे.
1. आफरिन शेख वय 30 रा. जागतियाल, तेलंगाना
गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा फटका आता राष्ट्रीय महामार्गाला देखील बसला आहे. पुण्याहून कोल्हापूर कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाले आहे. साताऱ्यातील बोरगाव जवळ दोन ते तीन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रस्त्याला सुरू असलेला पाऊस आणि महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्याचबरोबर महामार्गाचे काम सुरू असल्याने वांधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे बोरगाव नागठाणे उंब्रज अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील अंतोरे गाव पाण्याखाली गेले आहे. सतत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासोबतच हेटवणे धरणाचे दरवाजे उघडल्याने विसर्ग वाढला आहे. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली असून मोहल्ला परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. कमरेभर पाण्यातून नागरिकांना रस्ता शोधत यावे लागत आहे.
मुंबई विमानतळावर बॅरिकेडमुळे एअर इंडियाच्या विमानाचे नुकसान झाले आहे.
किती मोठे नुकसान झाले आहे आणि अपघात कसा झाला याबद्दल अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल.
पुणे शहरात गेल्या २४ तासात मुसळधार पाऊस
रात्रीच्या मुसळधार पावसानंतर आज सकाळपासून पुणे शहरातील अनेक भागात रिपरिप सुरू
पुणे शहरातील मुठा नदी ओव्हर फ्लो
मुठा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
पुणे शहरातील कुठल्या भागात किती पाऊस (मिलिमीटर)
खडकवासला: ८८.२
ढोले पाटील रोड: ५५.४
येरवडा: ७२
औंध बाणेर: ५४.२
कोथरूड बावधन: ८४.४
शिवाजीनगर: ५१.६
वारजे कर्वेनगर: ७९.८
सिंहगड रोड: ७४.८
वानवडी: ५५.२
कोंढवा: ५२
हडपसर मुंढवा: ५३
भवानी पेठ: ६६.६
बिबवेवाडी: ६८.४
कसबा: ७१.४
ताम्हिणी घाटात मागील २४ तासात ५७५ मिमी पावसाची नोंद
भिरामध्ये देखील ५६८ मिमी पाऊस
कोयना, खोपोली भागात देखील ३०० मिमी पार
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये देखील जोरदार पाऊस
विहारमध्ये २८७ मिमी, तुलसी २९६ मिमी, भातसा १६३, वैतरणा १७७, तानसा १८४ तर मध्य वैतरणात १४५ मिमी पावसाची नोंद
पावसामुळे पुण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे आज रद्द
सिंहगड एक्सप्रेस सह डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस सुद्धा रद्द
पुण्यातून या तीन रेल्वे दररोज मुंबईसाठी धावतात
दुपारच्या सत्रातील डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस सुद्धा आज रद्द
सोलापूर ते पुणे मार्गे मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आज धावणार नाही
काल मुंबईहून पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या सुद्धा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या
मुंबईतील मुसळधार पावसामुळे या रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती
पुण्याहून मुंबईसाठी आज कुठल्या ट्रेन रद्द, पाहूया
११०१०: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
११००७: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्सप्रेस
१२१२८: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस
२२१०६: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस
१२१२६: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
१२१२४: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्विन
२२२२६: वंदे भारत एक्सप्रेस
मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या अधून मधून जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
बोरिवली कडून वांद्रे च्या दिशेने जाणारा मार्गावर सांताक्रूझ,विलेपार्ले,अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगाव दरम्यान ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
गोरेगाव ते सांताक्रुझ 15 ते 20 मिनिटांचा प्रवास मात्र वाहन चालकांना एक ते दीड तासांमध्ये प्रवास करावा लागत आहे.
खरंतर सकाळची वेळ आहे मोठा संख्या मध्ये चाकरमानी कामासाठी निघाले आहेत मात्र या वाहतूक कोंडीमुळे मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.
सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गाची वाहतूक कोंडी काढण्याचे प्रयत्न देखील वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे....
(बुधवार, दि. 20 ऑगस्ट 2025)
दुपारी 3 वाजता : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) चा रौप्यमहोत्सव, बंटारा भवन, बँक्वेट हॉल, मर्सिडिज शोरुमजवळ, बंगळुरु-मुंबई रोड, बाणेर, पुणे
दुपारी 4.45 वाजता : सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटिलिजन्स इन्स्टिट्युटचे उदघाटन, सिम्बायोसिस इन्स्टिट्युट, पुणे
सायं. 6.30 वाजता : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक एकात्मिक दुमजली उड्डाणपूल (औंध ते शिवाजीनगर) प्रकल्पाचे लोकार्पण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, पुणे
कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणे एका सतरा वर्ष तरुणाच्या जीवावर बेतले. भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये शॉक लागून काल दीपक पिल्ले या 17 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीपक हा एल बी एस मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने निघाला होता. परंतु रस्त्यात महावितरणाची हाय टेन्शन वायर खुली होती. त्या मधून झालेल्या विजेचा प्रवाहामुळे शॉक लागून दिपकचा मृत्यू झाला. प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार दीपक याने कानात हेडफोन घातले होते. येथील नागरिकांनी त्याला हाक मारून बाजूला जाण्यासाठी आवाज देखील दिले, परंतु कानातल्या हेडफोन मुळे त्याला ऐकू आले नाही आणि तो या वायर च्या संपर्कात गेला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. महत्त्वाचा म्हणजे येथील नागरिकांनी या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या अनेक जणांना सूचना करून येथून बाजूला जाण्यास सांगितलं होतं. त्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण येथील स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले.
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून गेल्या 24 तासात 11 वेळा पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. कोयना धरणाचे सर्व दरवाजे 13 फुटांनी उघडून 95 हजार 300 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरण सध्या १०२ पीएमसी भरला आहे ..कण्हेर धरणातून 14 हजार 876, उरमोडी 8 हजार 900 क्यूसेस, वीर धरण 55 हजार 800,धोम धरणातून 17 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे..पावसाचा जोर वाढला असल्याने कोयना नदीवरील तांबवे, निसरे येथील बंधारे पाण्याखाली गेले असून संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूलही पाण्याखाली गेला आहे. पाटण तालुक्यातील 53 कुटुंबातील 253 लोकांना सुरक्षा स्थळी हलवण्यात आला आहे.. पाटणमध्ये गुहागर मधील 150 प्रवासी देखील अडकले.. कराड चिपळूण मार्गावर पाणी आल्याने रस्ते बंद करण्यात आले आहेत.. सातारा जिल्ह्यातील कोयना, कृष्णा वेण्णा नदीकाठच्या गावांना तसेच सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांना या पुराच्या पाण्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे या ठिकाणावरील आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवर आले आहे.
अलिबाग - 166.00
मुरुड - 113.00
पेण - 207.00
पनवेल - 233.00
उरण - 127.00
कर्जत - 228.00
खालापूर - 190.00
माथेरान - 438.4
रोहा - 147.00
सुधागड - 179.00
माणगाव - 138.03
तळा - 223.00
महाड - 113.00
पोलादपूर - 168.00
श्रीवर्धन - 83.00
म्हसळा - 177.00
एकूण पाऊस - 2930.43
दिवसभरातील सरासरी पाऊस 183.15 mm
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली
शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद
मुठा नदीच्या पाण्याने ओंकारेश्वर मंदिरात पाणीच पाणी
मुठा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे
खडकवासला धरणातून सध्या 35000 पाण्याचा विसर्ग होत असल्याने मुठा नदीवर ओव्हर फ्लो
शाहूवाडी तालुक्यातील कानसाखोऱ्यात प्रचंड अतिवृष्टीमुळे वारणा नदी व कानसा नदी यांचा संगम असलेल्या मालेवाडी गावा शेजारी विरळे जाणाऱ्या रस्त्यावर चार ते पाच फूट उंचीचे पाणी आल्यामुळे सोळा गावांचा संपर्क तुटलेला आहे. पूर्णपणे वाहतूक सेवा विस्कळीत झालेली आहे. शाळा बाजारपेठा बंद पूर्णपणे बंद ठेवले आहेत. वारणा नदी मधून 35 हजार क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे मालेवाडीसह नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत अतिवृष्टीची नोंद
विक्रोळीमध्ये मागील २४ तासात सर्वाधिक २२९.५ मिमी पावसाची नोंद
सांताक्रुज वेधशाळेत देखील मागील २४ तासात २०९ मिमी पाऊस
भायखळा, जुहू, वांद्रे आणि कुलाबा परिसरात देतील अतिमुसळधार पाऊस
दरम्यान, पुढील २४ तासात पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज
पुढील २४ तासासाठी मुंबई, ठाण्यासाठी आॅरेंज अलर्ट जारी
मात्र, रायगडला पुढील २४ तासासाठी रेड अलर्ट कायम
कलिना सब-स्टेशन परिसरात पाणी असल्याने वीज पुरवठा खबरदारी म्हणून बंद
अदानी इलेक्ट्रिसिटीकडून कलिना भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न
पाण्याचा निचरा होताच पुरवठा सुरळीत होणार असल्याची अदानी इलेक्ट्रिसिटी प्रशासनाची माहिती
मुंबईतील ७५ सब-स्टेशनपैकी ७४ सब-स्टेशनचा पुरवठा कार्यान्वित
काल सकाळी पावसाचा जोर अधिक अशात खबरदारी म्हणून
सकाळी १० वाजता काही भागातील पुरवठा बंद केला होता
मात्र, दुपारी १२ नंतर काही भागातील पुरवठा सुरळीत करण्यास अदानी इलेक्ट्रिसिटीच्या पावर वाॅरिअर्सकडून सुरुवात
उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सोडण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाढ करून आज दिनांक- 20.08.2025 रोजी सकाळी 9:30 वाजता 90000 क्यूसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात येणार आहे. सदर विसर्गा मध्ये आवश्यकते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
सोलापुरातील हिप्परगा तलाव ओव्हर फ्लो. शहर परिसरात असणारा हिप्परगा तलावाच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहतंय . ब्रिटिशकालीन असणारा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने सांडव्यातून वाहनाऱ्या पाण्याला जणू धबधब्याचे रूप
उजनी धरणाचा विसर्ग अजून वाढवून 91 हजार 600 क्युसेक करण्यात आला आहे . वीर धरणातूनही 50 हजार क्युसेक पेक्षा जास्त पाणी सोडण्यात येत असल्याने पंढरपुरात पूरस्थितीचा धोका वाढू लागलेला आहे .. सध्या चंद्रभागा पत्राच्या बाहेर येऊन घाटापर्यंत पोचू लागली असून दुपारपर्यंत चंद्रभागेचे घाटही पाण्याखाली जाणार आहेत .. सव्वा लाख क्युसिक विसर्गने पाणी येताच पंढरपूर शहराच्या जवळ असणारा व्यास नारायण वसाहत वगैरे भागात पाणी शिरण्यास सुरुवात होत असते ..
त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने आता नागरिकांना सावधान तिचा इशारा देण्यासाठी स्पीकर वरून सूचना देण्यास सुरुवात केली आहे ..आज संध्याकाळपर्यंत नदी काठावर असणाऱ्या वसाहतीत पाणी शिरणार असल्याने प्रशासनाने तातडीने या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी नियोजनाला सुरुवात केली आहे
रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम ..
महाड तालुक्यातील वरंध घाटात कोसळली दरड ..
घटनास्थळी महाड MIDC चे पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने दरड हटवण्यात प्रशासनाला यश !
रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणार्या वरंध घाटात दरड कोसळून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
वरंध घाटातील माझेरी गावाच्या वरील भागात ही दरड कोसळली
दरड कोसळल्या मुळे काही काळ वाहतूक देखील बंद होती.. सध्या वाहतूक एकेरी सुरू आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यांवर आलेले दगड,चिखल, कोलमडून पडलेली झाडे हटविण्याचे काम सुरू
सलग तिसऱ्या दिवशी ठाण्यात पावसाचे 'ठाण ' कायम. वंदना डेपो परिसर जलमय. महानगरपालिकेकडून सक्षम पंप च्या साह्याने पाणी निचरा करण्याचं काम सुरू... रेड अलर्ट असल्यामुळे वंदना बस डेपो परिसरात प्रवाशांची संख्या कमी... आत्तापर्यंत १८०.३० मिलिमीटर होऊन अधिक पावसाची नोंद...
दोन दिवस मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली. अजूनही मध्य रेल्वेची सेवा पुर्ववत होऊ शकलेली नाही. मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू आहे. तर हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिट उशिराने तर ट्रान्स हार्बरची वाहतूकही 15 मिनिटं उशिराने सुरु आहे.
हवामान खात्याचा नवा अलर्ट, मुंबईत पुढील तीन तास मुसळधार पावसाचा अंदाज. पालघर, रायगडमध्येही अतिवृष्टीची शक्यता
बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रात मागील दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस कोसळला आहे. तसेच, बुधवार, दिनांक २० ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्रीपासून अधून मधून संततधार पाऊस सुरु आहे.
सद्यपरिस्थितीत मुंबईतील जनजीवन सामान्य आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेसेवेसह 'बेस्ट' वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर (on field) अविरतपणे आणि तत्परतेने कार्यरत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे अनेक नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. माणगाव मधील काळ नदीला देखील पूर आल्यामुळे काळ नदीचे पाणी किनारपट्टी भागांमध्ये शिरल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालय. मुंबई गोवा महामार्गावर देखील ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक आहे ती मंदावलेली पाहायला मिळते. रायगड जिल्ह्यातल्या पूर परिस्थिती निर्माण करणाऱ्या सावित्री, कुंडलिका, आंबा या नद्यांच्या पानिपतित देखील मोठी वाढ झाल्यामुळे किनारपट्टी भागांमध्ये या नद्यांचे पाणी शिरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. रायगड जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालया आज पूर्णतः बंद राहणार आहेत. एकंदरीत पावसाचा जोर वाढला तर मोठा पूर रायगड जिल्ह्यात येण्याची दाट शक्यता आहे
मुंबईत मागील २४ तासात अतिवृष्टीची नोंद
आज मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी
मुंबई उपनगरांमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात
आज मुंबईतील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा
दुपारपर्यंत मुंबईतील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज
रायगडसाठी आज देखील रेड अलर्ट कायम, अतिवृष्टीची शक्यता
रायगडमधील अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, पूराचा धोका निर्माण होण्याची शक्यता
नाशिक, सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज
मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात, पूरग्रस्त नागरिकांना दिलासा
विदर्भात आज सर्व यलो अलर्ट जारी, विजांसह पावसाची शक्यता
पालघर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातील ओसंडून वाहत होते तर नद्यांचे पाणी गावांमध्ये गावांमध्ये शिरल्यामुळे ठीक ठिकाणचे रस्तेही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. आज पावसाने थोडे उसंत घेतले असली तरीही पावसाचा जोर कायम आहे. तर आज सुद्धा हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आले आहे. सूर्या प्रकल्पाचे धामणी धरणाचे तीन दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून त्याचा विसर्ग सूर्या नदीमध्ये सुरू आहे
रात्रभर पावसाने उसंत घेतल्यामुळे चिपळूण शहरातील पूर ओसरला असून येथील जनजीवन पूर्वपदावर आल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभर संपूर्ण शहराला पुराने वेढले होते मात्र रात्री उशिरा पुराचे पाणी ओसल्यामुळे नागरिक सुखावले आहेत. पुरामुळे शहरातील ठिकठिकाणी आलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी चिपळूण नगरपरिषदेचे कर्मचारी कार्यरत झाले असून शहरात चाळीसहून अधिक सफाई कर्मचारी काम करत आहेत.
वसई विरार शहरात काल सारखीच परिस्थिती आहे. सर्व रस्त्यांवर पाणी पाणी साचलं आहे. काल पावसाने वसई विरार शहरात चांगलाच हाहाकार माजवला होता. शहरातील सर्व जनजीवन ठप्प झालं होतं. रेल्वे, महामार्ग, शहरातील अंतर्गत रस्त्यावर पाणी साचल्याने ते ही ठप्प झाले होते. राञभर पावसाने आपली इनिंग चालू ठेवली आहे. सकाळी पावसाची सतंतधार सुरु आहे. रस्त्यावरील पाणी साचलेले आहे. सोसायटी आणि घरातही पाणी शिरलं आहे. आज शाळा कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवरील वसई आणि नालासोपारा रेल्वे ट्रॅकवर काल पाणी साचलं होतं. आज सकाळी पाणी ओसरलं आहे. माञ पाणी पूर्णपणे गेलेलं नाही. माञ पश्चिम रेल्वेच्या लोकल २० ते २५ मिनिटांनी उशीराने धावत आहेत. सध्या पावसाची सतंतधार सुरु आहे. पावसाचा जोर जर वाढला तर माञ नागरीकांच्या हाल बेहाल होतील. माञ आज ही ऑरेंज अलर्ट असल्याने नागरीकांनी घराबाहेर आवश्यकता असेल तर घराबाहेर पडावे असे आवहान पालिकेतर्फे करण्यात आले आहे
- नाशिक शहर आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मध्यरात्री पासून पावसाला सुरुवात
- गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने गंगापुर धरणातून केला जाणार पाण्याचा विसर्ग
सकाळी 8 वाजता 500 ते 9 वाजता 1500 क्युसेक वेगानं केला जाणार विसर्ग
पावसाचा जोर वाढला तर विसर्गात वाढ केली जाणार
नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आदेश
- गंगापूर सह जिल्ह्यातील इतर धरणामधून ही सुरू आहे विसर्ग
खडकवासला धरणातून सकाळी ९ वाजता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. ३५ हजार क्युसेकवरून ३९ हजार करण्यात येणार आहे.
पलूस तालुक्यातील आमणापूर येथील पूल पाण्याखाली
पुलावरून रात्रीपासून पाणी वाहत असल्याने हा पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात आला
मुंबईसह उपनगरला रविवार सोमवार आणि मंगळवारी पावसाने चांगलंच झोडपले होते. आज मात्र सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत ऑगस्ट महिन्यात 501 मिमी पाऊस पडतो .मात्र मागील तीन दिवसांत इतका पाऊस पडला. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरलं होतं. सकाळपासून पावसाने थोडीफार उसंत दिल्यामुळे रस्ते वाहतूक व्यवस्थित सुरू असल्याचं पाहिला मिळत आहे. हार्बर मार्गावरची रेल्वेदेखील सुरू आहे.
पंचगंगा नदीने यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच इशारा पातळी गाठली आहे...सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट 5 इंच इतकी असून जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेले आहेत... पंचगंगा नदीची पाणी पातळी अतिशय संथ गतीने वाढत आहे त्यामुळे कोल्हापूरकरांनी घाबरून न जाता सतर्क राहणे गरजेचे आहे... दिलासादायक बाब म्हणजे राधानगरी धरणाचे 7 पैकी 5 स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत...मध्यरात्री 3 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत हे दरवाजे बंद झाले...याचा अर्थ घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे....जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे धोकादायक ठिकाणाहून वाहतूक करू नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे..
आज सकाळी 6 वाजल्यपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
मोडकसागर 25111 cusecs
तानसा 38684.10 Cusecs
मध्य वैतरणा 1483 cusecs
तळकोकणाला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं. मात्र सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढला असून ३ ते ३.५ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज असल्याने मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्ली नदीवरील दुकानवाड भागातील तीन पूल पाण्याखाली आहेत. आज देखील जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचं हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे
विक्रोळी- 223.5
सांताक्रुझ- 206.6
भायखळा- 184.0
जुहू- 148.5
वांद्रे- 132.5
कुलाबा- 100.2
पुण्यातील खडकवासला धरणातून ३५ हजार क्यूसेक वेगाने मुळा मुठा नदीच्या नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदी लगतच्या गावांना आणि नदीपत्रालगत असलेल्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून पुण्यात संततधार पाऊस सुरू आहे तर घाट माथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोबतच धरण साखळीतदेखील मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुण्याच्या आजूबाजूच्या चारही धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे.
कोणत्या धरणात किती पाणीसाठा?
खडलवासला धरण- ८६.९९%
टेमघर-१००%
वरसगाव-९७.९७ %
पानशेत-९८.२४%
कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढून 33 फुटांवर पोचली
सांगली शहरातील कृष्णा नदी काठच्या भागातील नागरिकांचे रात्रीपासून स्थलांतर सुरु
सुर्यवंशी प्लाॅट, आरवाडे पार्क मधील एकूण 19 कुटूंबातील जवळपास 127 नागरिकांचे रात्रीच स्थलांतरण
कृष्णा नदीची सांगली येथील इशारा पातळी 40 फूट तर धोका पातळी 45 फूट इतकी
विसर्ग आणि पाऊस कायम राहिल्यास आज सायंकाळपर्यत इशारा पातळीवर जाऊ शकते पाणीपातळी
मंगळवारी झालेल्या तुफान पावसानंतर विस्कळीत झालेली मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतूक अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. काही भागांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
पुढील ३ तास महत्वाचे आहेत. मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि पुण्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याठिकाणी ऑरेंज अलर्ट जाही करण्यात आला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून इशारा जारी करण्यात आला आहे.
मोनो रेल्वे सायंकाळी 6.15 वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान बंद पडली. प्रवाश्यांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या क्रमांकावर संपर्क साधला. त्याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदत कार्य सुरु केले आहे.
मोनो रेल्वे सायंकाळी 6.15 वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान बंद पडली. प्रवाश्यांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या क्रमांकावर संपर्क साधला. त्याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदत कार्य सुरु केले आहे.
राज्यात आणि मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे लांब पल्ल्याच्या 16 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुणे, जालना आणि धुळ्याला जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.
वसई नालासोपारा स्टेशन दरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्याने वसई ते डहाणूपर्यंतच्या सर्व लोकल सेवा ठप्प झाल्या आहेत. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने वसई ते नालासोपारा ट्रक वरून प्रवाशी चालत जात आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे. मुंबईच्या समुद्र किनारपट्टीवरही जोरदार पाऊस सुरू आहे. वाऱ्याचा वेगही वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईच्या समुद्रात उधाणाच्या भरतीची वेळ रात्री 8.53 ची आहे आणि त्यावेळी समुद्रात 3.14 मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे.
मुंबईत सुरू असलेल्या पावसाने हिंदमाता परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. हिंदमाता परिसरात साचलेले पाणी काढण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असताना दुसरीकडे अंधेरी परिसरातील एल अँड टी कंपनीमध्ये आग लागली आहे. कंपनीच्या बेसमेंटमध्ये ही आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Mumbai Rain Local Train Update : ठाणे कडून मुंबई सीएसटीकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे सेवा सुरळरीत करण्यात आल्यावर प्रशासनाकडून पुढील सूचना देण्यात येतील.
csmtकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे फलाटावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असल्याचे पहायला मिळत आहे. फलाटावर या संदर्भात रेल्वेप्रशासनाकडून सूचना करण्यात येत आहे.
Mumbai Rain Update : मुसळधार पाऊस पडत असल्याने मुंबई विमानतळावर येणारी विमाने वळवण्यात आली आहेत. इंडिगो एअरलाइन्सच्या सहा विमानांचे उड्डाणे आणि स्पाइसजेट आणि एअर इंडियाच्या प्रत्येकी एका विमानाचे उड्डाण सुरत, अहमदाबाद आणि हैदराबादसह जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आले.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी विमानांचे उड्डाणे वळवण्यात आली आहेत. विमानतळ सूत्रांचे म्हणणे आहे की कोणत्याही वेळी विमानतळाचे कामकाज पूर्णपणे बंद करण्यात आले नव्हते.
Mumbai Rain Update : मुसळधार पाऊस पडत असल्याने मुंबई विमानतळावर येणारी विमाने वळवण्यात आली आहेत. इंडिगो एअरलाइन्सच्या सहा विमानांचे उड्डाणे आणि स्पाइसजेट आणि एअर इंडियाच्या प्रत्येकी एका विमानाचे उड्डाण सुरत, अहमदाबाद आणि हैदराबादसह जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आले.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी विमानांचे उड्डाणे वळवण्यात आली आहेत. विमानतळ सूत्रांचे म्हणणे आहे की कोणत्याही वेळी विमानतळाचे कामकाज पूर्णपणे बंद करण्यात आले नव्हते.
लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने अनेक लोक या ठाणे स्टेशन पर्यंत थांबले आहेत.
काही एक्सप्रेस गाड्या सुद्धा रद्द झाल्या आहेत, तर काही उशिराने आहेत त्यामुळे अनेक प्रवासी ठाणे स्टेशनवर बसून आहेत.
शिवाय लोकल ठाणे स्टेशनवर थांबले आहेत, तिथे सुद्धा तास दोन तासापासून प्रवासी लोकल सेवा पूर्ववत होण्याची वाट बघत आहेत.
मात्र पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही.
त्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप आपल्याला ठाणे स्टेशनवर पाहायला मिळतोय.
ठाण्यातील लोकमान्य नगर येथे मुसळधार पावसाने दरड कोसळली
या भागातील घरांवर दरड कोसळली, चार घर रिकामी केली
अमरनाथ शर्मा (७०) यांच्या कमरेला व खांद्याला दुखापत झाली असल्याने त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.
चार घरे रिकामी करण्यात आली आहेत व धोका पट्टी लावून बॅरिगेटिंग करण्यात आले आहे.
डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी मदत करत आहेत.
भांडुप लेख रोड परिसरामध्ये झाड कोसळून त्या झाडाखाली दहा ते बारा रिक्षा चिरडल्या गेल्या आहेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. सकाळपासून मुसळधार पावसासह सोसाड्याचा वारा देखील सुटला आहे, ज्यामुळे या परिसरातील झाडे उन्हाळून पडली आहेत आणि त्याखाली दहा ते बारा रिक्षा चिरडल्या गेल्या
हार्बर रेल्वे बंद असल्याने प्रवाशांचा खोळंबा
पनवेल ते मानखुर्द पर्यंत हार्बर रेल्वे सुरू
मुंबईत जाणारे प्रवासी वाशी स्थानकात अडकले
गेल्या एक तासापासून रेल्वे आलेली नाही..
11011 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धुळे एक्स्प्रेस रद्द
12071 - जनशताब्दी एक्स्प्रेस - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हिंगोली रद्द
22159 - छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस - एम. जी.आर. चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस रद्द
12188 - छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस - जबलपुर गरीब रथ एक्सप्रेस रद्द
मुंबई सह पश्चिम उपनगरात आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी लिंक रोड पाण्याखाली गेला आहे
अंधेरी लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी भरला आहे,अंधेरी लिंक रोडवर पाणी भरल्यामुळे मनसे आक्रमक
मनसे कडून लिंक रोडवर भरलेल्या पाण्यात उभा राहून मुंबई महानगरपालिका आणि पालकमंत्री चा विरोधात आंदोलन करण्यात आले
अंधेरी लिंक रोड हा हाय प्रोफाईल परिसर आहे मात्र मागच्या तीन दिवसापासून लिंक रोडवर पाणी भरत असल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे
मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई कडून मुंबई महानगरपालिकेच्या 100% नालेसफाई च्या दावा फक्त कागदावर आहे
त्याचसोबत तीन दिवसात जोरदार पावसात पश्चिम उपनगरात भरलेला पाण्याच्या ठिकाणी उपनगराचे पालकमंत्री उपनगरात फिरल्या नसल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे...
या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांकडून पालिका विरोधात आणि पश्चिम उपनगराचे पालक मंत्री विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
- डहाणू ते कासा या दरम्यान गजांड गावाजवळील रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद
- पाचमड पूल NH160A बंद
- चिंचघर पूल NH160A बंद
- शीळ देहजे, दाधडे, भोपोली NH बंद
- अंबरभूई वाडा तालुका रोड बंद
बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी 3.9 मीटर इतकी वाढली होती. ही बाब लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्रांतीनगर, कुर्ला या परिसरातील सखल भागातील सुमारे 350 नागरिकांचे स्थलांतर हे तात्पुरत्या निवाऱ्याचे ठिकाण असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मगनदास मथुराम मनपा शाळेत करण्यात आले आहे. या ठिकाणी सदर नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.
तसेच आता समुद्राची भरती ओसरू लागल्यानंतर मिठी नदीची पातळी देखील ओसरू लागली असून ही पातळी 3.9 मीटर वरून आता 3.6 मीटर इतकी झाली आहे.
सेंट्रल, हार्बर पाठोपाठ वेस्टर्न रेल्वेमार्गावरही वाहतूक ठप्प! वसई ते विरार स्थानकांदरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल ट्रेनचा खोळंबा झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पाणी साचलेल्या भागाचा पाहणी दौरा केला
ठाण्यातील नौपाडा भागातील भांजेवाडी परिसरातील घरांमध्ये साचले पाणी
पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा
मोठी बातमी : राज्यातील पावसामुळे १२ जणांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांचा मृत्यू
मुंबईत एका व्यक्तीचा भिंत पडून मृत्यू
तर दोन राज्यातील इतर भागातून मृत्यू झाल्याची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर पाणी भरले आहे.
अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतीक्षा बंगल्याबाहेर पाणी भरले आहे आणि बंगल्यातही पाणी शिरले आहे.
मुख्य गेटवर सुरक्षा कर्मचारी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थोड्या वेळापूर्वीच मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि मुंबई शहर आणि परिसर तसेच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थोड्या वेळापूर्वीच मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि मुंबई शहर आणि परिसर तसेच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना केल्या.
मिठी नदी धोका पातळी ४.९ मी वर आहे, इशारा पातळीवर ती सध्या आहे… ३.९ वर आहे
काही ठिकाणी पाणी शिरले आहे त्यांना बाहेर काढण्यात आलंय
मिठी संदर्भात आमचं लक्ष आहे, सोबतच पालिका देखील लक्ष ठेऊन आहे
विक्रमी पाऊस होतोय, त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालीय
ट्रान्सपोर्टेशन देखील कमी झालंय
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे थोडी विस्कळीत आहे, मात्र हार्बर मार्गावर पाणी आल्याने विस्कळीत आहे
सध्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली आहे.
तर हार्बर रेल्वेमार्गावरील (Harbour Railway) लोकल ट्रेनही 55 तास उशीरा धावत आहेत.
पश्चिम रेल्वेमार्गावरील (Western Railway) लोकल ट्रेन 25 मिनिटं उशिराने धावत आहेत.
मिरा-भाईंदर : मुसळधार पावसाने काशिमीरा ते दहिसर चेकनाका पर्यंत वाहतूक ठप्प; मिरा-रोडच्या अनेक परिसरात पाणी घरात शिरले
मुंबईसह मिरा भाईंदर शहारात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काशिमीरा ते दहिसर परिसरातील संपूर्ण महामार्ग ठप्प झाला आहे.
दहिसर ते काशिमिरा हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
मिरा गावठाण व मुन्शी कंपाऊंड येथे पाणी घरात शिरले असून काही ठिकाणी कंबरेपर्यंत पाणी साचले आहे. त्याचप्रमाणे मिरा रोड व भाईंदरच्या अनेक सखल भागातही पाणी शिरले आहे.
मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे....
मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दहिसर पूर्वेत आनंदनगर मेट्रो स्टेशन शेजारी असलेली सर्व इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरला आहे.
आनंद नगर मेट्रो स्टेशन खाली चैत्रा इमारतीमध्ये चार ते पाच फूट पाणी भरला आहे.
या इमारतीचा ग्राउंड फ्लोअर अर्धा पाण्याखाली गेला आहे, ग्राउंड फ्लोअर मध्ये असलेल्या घरांमध्ये सुद्धा पाणी जाऊन घरातील साहित्य आणि सामांच मोठा नुकसान झाला आहे.
इमारतीचे पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाड्या सुद्धा अर्धा पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे आज सकाळपासून सुरू असलेला जोरदार पावसामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे.
शहरातील नजराणा कंपाऊंड येथील परिसरातील शेकडो दुकानांमध्ये शिरले पाणी
पाण्याचा जोर कायम राहिल्यास छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देखील पाणी भरण्यास सुरुवात
परिसरामध्ये वाहतूक कोंडी
पालिका आपत्कालीन टीम घटनास्थळी दाखल
परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे.
पनवेल मधील गाडी नदीने धोकादायक पातळी काढली
नदी तुडुंब भरली असल्याने पनवेल महापालिका कडून सतर्कतेचा इशारा
पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडून गाडी नदीची पाहणी
नदीकाठी राहणाऱ्या लोकांना केले स्थलांतरीत
३५० लोकांना बाजूला असलेल्या शाळेत केले स्थलांतर
पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास लोकांना बाहेर काढण्यासाठी १० बोटी तयार..
भिवंडी शहरात व ग्रामीण भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भाजी मार्केट, बाजारपेठ व तीन बत्ती परिसरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले असून बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. तर काही दुकानांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे मालाचे नुकसान झाले आहे. बाजारपेठ परिसरातील हॉटेल चालकांना कामगारांसाठी अक्षरशः पाण्यात उभा राहून पुरी व वडे काढावे लागत आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती अजून बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जागोजागी भिवंडी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टीम दाखल होत असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मध्य रेल्वेची लोकल खोळंबली
सायन -दादर दरम्यान लोकल खोळंबली
तब्बल अर्धा तासांहून अधिक वेळ लोकल सायन आणि दादर दरम्यान खोळंबलीय
रेल्वे ट्रॅक वरती पाणी भरल्याने लोकल खोळंबलीय
सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा परिसर जलमय झाला आहे. पावसाने दमदार बॅटिंग करताच रस्त्यांवरून अक्षरशः नदीसारखे पाणी वाहताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.
मुंब्रा बायपाससह अनेक अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. वाहनधारकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, परिसरातील अनेक दुकानांतही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
अलिबाग- 190.00
मुरुड - 93.00
पेण - 190.00
पनवेल - 207.8
उरण - 139.00
कर्जत - 175.00
खालापूर - 132.00
माथेरान - 254.6
रोहा - 223.00
सुधागड - 176.00
माणगाव .. 217.00
तळा - 241.00
महाड - 157.00
पोलादपूर - 161.00
श्रीवर्धन - 208.00
म्हसळा - 251.00
एकूण पाऊस - 3015.4
दिवसभरातील सरासरी पाऊस 188.46 mm
ठाणे- कळवा -मुंब्रा खाडीला भरतीला सुरुवात...
सतत दोन दिवसात पडत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात...
ठाण्याला लागूनच असणारा कळवा खाडी आणि मुंब्रा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाडीला भरतीला सुरुवात झाली असून खाडीकिनारी असणाऱ्या बोटीला प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे....
चिपळूण मध्ये पावसाचा जोर वाढला..... शहरातील विविध ठिकाणी वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात
चिंचनाका येथे पाणी साचले..... शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत
जनजीवनावर मोठा परिणाम...
नदीच्या शेजारच्या व्यापाऱ्यांकडून सामान सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात....
आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा शहरांमध्ये तैनात.
आवश्यकता नसल्यास घराच्या बाहेर न पडण्याच्या प्रशासनाच्या सूचना
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस
50 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला
पुरामुळे जिल्ह्यातील 9 मार्ग बंद
वाशिम जिल्ह्यातील प्रमुख नद्याला सलग ४ दिवस पूर
मुंबई उपनगरांत मागील २४ तासात अतिवृष्टीची नोंद
विक्रोळी परिसरात सर्वाधिक २५५.५ मिमी पाऊस
भारतीय हवामान विभागाची माहिती
सोबतच, भायखळा, सांताक्रुज, जुहू, वांद्रे परिसरात देखील अतिवृष्टी
पुढील २४ तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा
मुंबई उपनगरांत मागील २४ तासात अतिवृष्टीची नोंद
विक्रोळी परिसरात सर्वाधिक २५५.५ मिमी पाऊस
भारतीय हवामान विभागाची माहिती
सोबतच, भायखळा, सांताक्रुज, जुहू, वांद्रे परिसरात देखील अतिवृष्टी
पुढील २४ तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा
बोरिवलीतील पोयसर सबवे वाहतुकीसाठी बंद
पाण्याची पातळी वाढल्याने सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे
पश्चिम उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच
सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण 100% भरण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. त्यामुळे 53 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे तसेच सुरू असलेल्या पावसामुळे कोयना नदीवरील जुना संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच मिस्त्री आणि तांबवे येथील बंधारे सुद्धा पाण्याखाली गेले आहेत. या परिसरात पाऊस वाढल्याने प्रशासनाकडून सूचना दिल्या जात आहेत.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने ठाण्यातील कळवेकर रेल्वे प्रवासी थेट उतरले रेल्वे ट्रॅकवर...
कळवा परिसरातील रेल्वे कारशेट वरून सुटणाऱ्या रेल्वे ट्रेन पकडण्याकरिता नागरिकांची कारखेड ट्रॅकवर मोठी गर्दी.
अनेक कळवेकर रेल्वे प्रवासी जीव धोक्यात टाकून भर पावसात रेल्वे ट्रॅक वरून ट्रेन पकडण्याचा करत आहेत प्रयत्न...
मुंबईत आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने मुंबईत पुढील तीन ते चार तासांमध्ये अत्यंत तीव्र सरी बसरण्याचा अंदाज वर्तवला आहे. सकाळी नऊ वाजले तरी मुंबईत रात्रीसारखा अंधार पसरला आहे. आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु असल्याने रस्त्यावर काही अंतरावरचे दिसणेही अवघड झाले आहे.
कल्याण-डोंबिवलीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू
अधूनमधून पावसाचा जोर वाढत-घटत असल्याचे चित्र..
हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा...खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने आज शाळांना केली सुट्टी जाहीर
काल मुंबई-उपनगरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले
आज पावसाचा जोर कमी असल्याने कल्याण-डोंबिवलीत पाणी साचलेले नसले तरी सखल भागात धोका कायम
नागरिकांना सतर्क राहण्याचे पालिका प्रशासनाचे आवाहन
रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे रायगड जिल्ह्यातल्या सर्व शाळा आज बंद राहणार आहेत. काल झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रोहा तालुक्याला बसला त्यानंतर महाड तालुक्यामध्ये देखील काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे तेथील जनजीवन आहे ते विस्कळीत झालं होतं, आज सुद्धा पावसानं दमदार बॅटिंग सुरू केली असून काही नद्यांच्या पाणीपातलीत हळूहळू वाढ होताना पाहायला मिळते,
नांदेड ब्रेकिंग
मुखेड तालुक्यात बचावकार्य पुर्ण झाले आहे, चार गावात पुराच्या पाण्यात 293 लोक अडकले होते.
- रावणगाव - येथून 225 जणांना सुरक्षित बाहेर काढले
- रात्री पाऊस रिमझिम झाला
- हसनाळ येथून 8 जणांना बाहेर काढले, पाच जण वाहून गेले त्यापैकी चार मृतदेह सापडले
- भासवाडी - 20 जणांना बाहेर पडले
- भिंगोली - 40 जणांना बाहेर काढले
- एसडीआरएफ च्या पथकाने पुर्ण केलें बचावकार्य
रत्नागिरी- जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार..
काजळी नदीने ओलांडली इशारा पातळी...
नदीने पातळी ओलांडल्याने चांदेराई लांजा रस्त्यावर पाणी...
रसत्यावर जवळपास तीन फुट पाणी,चांदेराई लांजा अशी वाहतुक ठप्प ...
हरचेरी बाजारपेठेत पाणी भरण्याची शक्यता...
वंदना डेपो परिसरात गुडघ्यावर पाणी....
बस बंद पडल्यामुळे चाकरमान्यांना फटका...
वंदना डेपो, स्टेशन रोड, मुख्य बाजारपेठ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी...
जालन्यात वृद्ध शेतकरी नदीत वाहून गेला
जोरदार पावसाने एकरुखा गावातील बहिरी नदीला पूर, वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध सुरू.
अँकर - जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या एकरुखा गावातील अण्णासाहेब सानप या 70 वर्षीय शेतकऱ्याचा नदी ओलांडताना पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडलीय, आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी आणि जिल्हा प्रशासनाकडून या शेतकऱ्याचा शोध सुरू आहे..
जिल्ह्यात आज सकाळ पासून पावसाने विसावा घेतला असून काल झालेल्या जोरदार पावसाने नदीला पूर आला असून नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा स्थानिक गावकरी आणि प्रशासनाच्या कडून शोध सुरू आहे.
दादर स्थानकाजवळून माटुंगाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी
दादरमध्ये देखील मुसळधार पाऊस
मागील तीन ते चार दिवसापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे, जिल्ह्यातील नद्या नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत नद्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे. पुराचे पाणी नदीचे पात्र सोडून शेतामध्ये शिरल आहे, त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे, त्यामध्ये हळद सोयाबीन कापूस या पिकांचं अतोनात नुकसान झाला आहे. पैनगंगा नदीचा पाणी काल कनेरगाव नाका शिवारांमधील शेतीमध्ये शिरले होते. मागील 36 तास या शेतामध्ये पाच ते सहा फूट पाणी होतं. त्यामुळे शेतातील पिकांचा अतोनात नुकसान झालेला आहे. आता हळूहळू पूर ओसरत असल्याने या नुकसानीची गंभीरता समोरीत आहे, शेतातील हळद आणि सोयाबीन हे पीक पूर्णपणे जमीन दोस्त झाला आहे, शेतामध्ये हळदीच्या सिंचनासाठी असलेले ठिबक सुद्धा पूर्णपणे वाहून गेले आहे.
माजीवाडा परिसरात वाहतूक कोंडी
सकाळी पासून ठाणेकरांना पावसाचा फटका पडण्यास सुरुवात झाली आहे.
ठाण्यातून घोडबंदर रोड चा दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे तसेच सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
मुंबईत आज मध्य रात्र पासून सुरू असल्या मुसळधार पावसामुळे वीरा देसाई रोड पुन्हा पाण्याखाली गेला आहे.
जोगेश्वरी पश्चिम वीरा देसाई वर कंट्री क्लब समोर मोठ्या संख्येमध्ये गाड्या रस्त्यावर बंद पडल्या आहेत.
वीरा देसाई रोड ओशिवरा लोखंडवाला जोडणारा मुख्य मार्ग आहे, मात्र या रस्त्यावर तीन ते चार फूट पाण्या भरल्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहे.
वीरा देसाई रोडवर असलेल्या हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरला आहे.
काल जोरदार पावसामुळे वीरा देसाई रोड पूर्ण दिवस पाण्याखाली गेला होता.
आज मध्य रात्र पासून सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा वीरा देसाई रोड पाण्याखाली गेला आहे.
रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्गात देखील मुसळधार
पुढील ३ तासांसाठी चारही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहणार, ४५-५५ किमी प्रति तास वारे वाहण्याची शक्यता
पुणे शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
काल दिवसभर झालेल्या पावसानंतर पुण्यातील खडकवासला धरणातून आता पाण्याचा विसर्ग 4000 क्युसेकने नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
खडकवासला धरण क्षेत्रामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.
सततच्या पावसाचा मुंबई लोकलला मोठा फटका
सध्या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक सुरू मात्र प्रचंड उशिराने
मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटे,
हार्बर रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशिराने
पश्चिम रेल्वे 15 मिनिटे उशिराने
पावसाचा जोर राहिला तर रुळांवर पाणी येण्याची शक्यता
तर शहाड आणि आंबिवली दरम्यान तांत्रिक बिघाड
त्यामुळे कसारा हून येणाऱ्या लोकल अधिक उशिराने
कसारा, आसनगाव, टिटवाळा इथून सुटणाऱ्या लोकल उशिराने
मध्यरात्री नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन नागपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यू मनीष नगर भागात अनेक सोसायटी मध्ये पाणी साचले ...
ड्रेनेज सिस्टीम ब्लॉक झाल्याने नागरिकांचे घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे.
पालिकेचे कर्मचारी वेळेवर पोहचत नसल्याने स्वतः नागरिकांना कुदळ फावडा घेऊन पाणी बाहेर काढण्याचे काम करत आहे.
नालासोपार : वसई विरार नालासोपर येथे सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर बघायला मिळाला आहे. रात्रीपासून पावसाचा कहर सुरु होता. त्यामुळे वसई विरार आणि नालासोपारा शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचलं होतं. काहींच्या घरात ही पाणी साचलं आहे.
शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील सखल भागातील रस्ते ही पाण्याखाली होते. शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना पाण्यातून मार्ग काढताना तारांबळ उडत होती. अनेक वाहने ही बंद पडत होते.
हवामान विभागाने आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. तर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा कॅालेजना सुट्टी जाहीर केली आहे.
सध्या रायगड मध्ये पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाला आहे आणि रोहा तालुक्यातील कुंडलिका या नदीवरील मुख्य दोन वाहतुकीसाठी बंद केले होते. आता सर्व प्रकारच्या वाहतुकी सुरू करण्यात आले आहेत. मुंबई गोवा जिल्ह्यात आज रेड अलर्ट असल्याने सर्व शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
मुंबईत आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता असून बुधवार पासून पावसाचा जोर कमी होईल ,असा पूर्वानुमान हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
सविस्तर बातमी येथे वाचा
कोल्हापूर गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद
मांडूकली या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद केली.
राजापूर शहरात मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी राजापूर शहरातील जवाहर चौकात शिरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मध्यरात्रीपासून जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. आज दिवसभर देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात रात्र पासून जोरदार पाऊस सुरू आहे.
पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी,गोरेगाव, मालाड,कांदिवली,बोरिवली,दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ,वांद्रे या सर्व परिसरात पाऊस सुरू आहे.
जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे.
अंधेरी सबवे मध्ये तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सध्या गोखले पुलाचा वापर करा असा सूचना वाहतूक पोलिसांकडून दिल्या जातात.
कोल्हापूर ब्रेकिंग
गेल्या 36 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच
पंचगंगा नदीची हळूहळू इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल
सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 34 फूट 8 इंच इतकी
कोल्हापूर जिल्ह्यातील 57 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली
राधानगरी धरणाचे सात ही स्वयंचलित दरवाजे अद्याप उघडलेले
पंचगंगा नदीची 39 फूट इशारा पातळी, 43 फूट धोका पातळी मानली जाते
अलमट्टी धरणांमधून विसर्ग वाढवल्याने कोल्हापूरकरांना दिलासा
नवी मुंबईत पावसाचा जोर बघायला मिळाला आहे. पण काल ज्या ठिकाणी 1 ते दीड फुट पाणी साचले होते, तिथे पाणी साचलेले नाही.
पुणे शहरात ढगाळ वातावरण आहे, मात्र पाऊस नाही.
तळकोकणाला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं. त्यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यातू वाहणाऱ्या कर्ली नदीच्या उगमा जवळील तीन ते चार पूल पाण्याखाली गेली. आंबोली मधील मुख्य धबधब्याचे रौद्ररूप धारण केलं. जिल्हाला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सिंधुदुर्ग किनाऱ्यावर विजयदुर्ग ते तेरेखोलपर्यंत उंच लाटांचा इशारा आज दुपार नंतर ते उद्या दुपारी २:३० या वेळेत ३.५-३.७ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन मंत्री नितेश राणेंनी देखील सोशल मीडियावरून केलं आहे
हवामान इशारा – जळगाव जिल्हा ⚡🌧️
पुढील ३-४ तासांत जिल्ह्यातील काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस, वादळी वारे व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
🙏 नागरिकांनी उघड्या जागेत थांबणे टाळावे, विजेच्या खांबांपासून व झाडांपासून दूर राहावे, नदी-नाल्याजवळ न जाण्याचे आवाहन.
📢 हा इशारा मंत्रालयाकडून जारी
नवी मुंबईत संततधार पाऊस पडत आहे. अधून मधून मुसळधार पावसाच्या सरी येत आहेत.
सखल भागात पाणी साचायला सुरवात झाली आहे.
मुसळधार पावसामुळे हिंदमाता परिसरात पाणी साचलं, गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी. नागरिकांची प्रचंड गैरसोय, मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर
वसई विरार नालासोपाऱ्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर बघायला मिळाला आहे. रात्रीपासून पावसाचा कहर सुरु होता. त्यामुळे वसई विरार आणि नालासोपारा शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचलं होतं. काहींच्या घरात ही पाणी साचलं आहे.
नालासोपारा पूर्व स्टेशन परिसर, सेंट्रल पार्क, आचोळे रोड, तुळींज, शिर्डी नगर, गाला नगर, विजय नगर, विरार आगाशी रोड, बोळींज, विवा कॅालेज परिसर, चंदनसार, वसई बस डेपो, येथील रस्त्यावर पाणी साचलं होतं. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील सखल भागातील रस्ते ही पाण्याखाली होते. गास रोड, देवतलाव, सागरशेत, मर्देस, निर्मळ, गिरीज इत्यादी सकल भागातील मुख्य रस्त्यावर पाणी साचले होते.
कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना पाण्यातून मार्ग काढताना तारांबळ उडत होती. अनेक वाहने ही बंद पडत होते.
हवामान विभागाने आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. तर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
चिपळूण कराड मार्गावर तिहेरी अपघातात 5 जण ठार.
गॅस वाहून नेणाऱ्या ट्रकवर रिक्षा आणि ठार जोरदार आधळून रिक्षातील चार तर थार मधील एकाच जागीच मृत्यू. रात्री उशिराची घटना.
भरधाव थार चालकाच्या चुकीमुळे रिक्षामधील प्रवासी हकनाक दगावले.
चिपळूण कराड मार्गावरील पिंपळी येथील दुर्दैवी घटना.
मृतांमध्ये एका लहान बाळाचा समावेश.
थार कार सह,रिक्षाचा चक्काचूर..
चिपळूण पोलिस घटनास्थळी
उत्तर रत्नागिरी मध्ये पावसाचा जोर कायम.
खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीवर तर चिपळूण मधील वाशिष्ठी नदीत इशारा पातळीजवळ.
सतत पडणाऱ्या पावसामुळे चिपळूण मधील नाईक कंपनी परिसरात पाणी, तर खेड मधील जगबुडी आणि नारंगी नदीच्या पुराचे पाणी बाजारपेठेत शिरण्याची भीती.
घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज.... प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना.
पालघरला आज रेड अलर्ट घोषित असला तरीही मध्यरात्रीपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. आज प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीही जाहीर केली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात रात्र पासून जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी,गोरेगाव, मालाड,कांदिवली,बोरिवली,दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ,वांद्रे या सर्व परिसरात पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कमी असल्यामुळे पश्चिम उपनगरात कुठेही सखल भागात पाणी भरला नाही. जर असाच जोरदार पाऊस सुरु राहिला तर पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात होणार आहे..
मुंबई लोकल ट्रेन अपडेट
मध्य रेल्वे- १५- २० वीस मिनिटं उशिराने
पश्चिम रेल्वे - १०-१५ मिनिटे उशिराने
हार्बर लाइन- १५ ते २० मिनिटे उशिराने
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकत आहेत. हे क्षेत्र मुंबईजवळ असल्याने त्याचा प्रभाव मंगळवारी देखील जाणवणार आहे. मंगळवारी मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र बुधवारी गुजरातकडे सरकल्यानंतर पावसाचा जोर कमी होईल असं हवामान खात्याच म्हणणं आहे. मुंबईत रात्रभर पाऊस कोसळत असून आज दिवसभर अशीच परिस्थिती असणार आहे. त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मुंबईतील परळच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून कामावर जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- मुंबई
- Mumbai Rains Live Updates: मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल ट्रेनची वाहतूक पूर्वपदावर, हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट कायम