Mumbai Rain Updates : मुंबईच्या (Mumbai) माहीम (Mahim) येथील दर्ग्यात दर्शन घेण्यासाठी आलेले दोन तरूण मिठी नदीत (Mithi River) वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मध्यरात्री माहीम खाडीवर उभं असताना एका मित्राचा पाय घसरल्यानं तो वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्यानं धाव घेतली असता तोही वाहून गेला. मध्यरात्री भरती असल्यानं अग्निशमन दलाला बचाव कार्य करता आलं नाही. मात्र पाणी ओसरताच एकाचा मृतदेह किनाऱ्यालगत आढळून आला तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे. जावेद आणि आसिफ अशी वाहून गेलेल्याची नावं आहेत.


कुर्ला येथील दोन तरुण जावेद आणि आसिफ माहीम दर्ग्यात दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यावर दोघेही जवळच असलेल्या माहिमच्या खाडीवर गेले. मध्यरात्री घरी जात असताना शौचाला जाण्यासाठी दोघेही खाडीपाशी गेले. त्यावेळी दोघांपैकी एकाचा पाय घसरला आणि तो खाडीत पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्यानं खाडीत उडी घेतील, पण तो देखील बुडाला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पण मध्यरात्री मुंबईत मुसळधार पाऊस होता. तसेच भरती होती. मध्यरात्री भरती असल्यानं अग्निशमन दलाला बचाव कार्य करता आलं नाही. मात्र पहाटे पाणी ओसरताच एका तरुणाचा मृतदेह किनाऱ्यालगत आढळून आला. तर दुसऱ्या मित्राचा शोध अद्याप सुरुच आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरु आहे. 


राज्याच्या विविध भागांत पावसाची हजेरी


सध्या राज्यात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यासह, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात देकील पावसाची संततधार सुरुच आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :