Mumbai Rain Update : मुंबईत गेल्या 24-36 तासांत मुसळधार पाऊस पडत असल्याने, पुढील आठवड्यात आणखी पाऊस पडेल, रविवारी बहुतांशी मध्यम ते मुसळधार पाऊस असेल आणि सोमवार (15 जुलै) आणि मंगळवार (16 जुलै) रविवारपेक्षा जास्त पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज, हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी व्यक्त केला आहे.
मध्य महाराष्ट्र घाट परिसरात , कोकणात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता
रत्नागिरी सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय. मुंबई शहर आणि उपनगरातील पुढील 48 तासांत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 28 आणि 24 CC राहणार असल्याचा अंदाज आहे.
पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. पश्चिम उपनगरात मागील 15 मिनिटांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अंधेरी सबवे खाली चार ते पाच फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
वसई विरार नालासोपारा परिसरात धुवाधार पाऊसाची बॅटिंग
मुंबई आमदाबाद महामार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल असून, विरार फाटा, कोपर रोड,गाव खेड्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी साचून वाहतूक विस्कलीत झाली आहे. महामार्गांवर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने वाहन धारक हैराण झाले आहेत.असाच पाऊस पडत राहिला तर वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील गाव,खेडे पाड्यात नागरिकांचं जनजीवन विस्कळीत होण्याची शकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या