Mumbai Rain News : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस (Mumbai Rain) सुरु आहे. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास मुंबईत काही ठिकाणी मसुळधार ते अति मसुळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात काल वर्तवण्यात आली होती. त्यानुसार मध्य रात्रीपासून मुंबईत पाऊस सुरु आहे. दरम्यान, आजही मुंबईत मुसळधार पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील 3 ते 4 तास पावसाची संततधार कायम राहणार असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे.
मध्यरात्रीपासून मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 सेल्सिअस आणि 25 सेल्सिअसच्या आसपास असणार आहे. तसेच मुंबईत पुढील 3 ते 4 तास पावसाची संततधार कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं सखल भागात पाणी साचत आहे. सकाळी साडेपाच वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत 51.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे तर पश्चिम उपनगरात 27 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
आज राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तिथे अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भात आजही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसानं चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतीच्या कामांना देखील वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. यावर्षी जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान तज्ज्ञांनी वर्तवली होती. त्यानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
कोकणसह पश्चिम महाराष्ट्र सावधान, 'या' जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह विदर्भातही यलो अलर्ट