Mumbai Rains Live Update : आज मुंबई आणि ठाण्यात ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

Advertisement

Maharashtra Mumbai Rains Live : मुंबईत 13 आणि 14 जून रोजी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय कोकण आणि विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jun 2021 07:23 AM
 मृग नक्षत्राने आज वेळापूर आणि परिसराला पावसाने झोडपले , माळशिरस तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस  
माळशिरस तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. चार वाजता सुरू झालेला हा पाऊस सुमारे अडीच तास मुसळधारपणे  कोसळत होता.  या मुसळधार पावसामुळे माळशिरस तालुक्यातील विझोरी पाटी याठिकाणी पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरती सुमारे चार फूट पाणी आल्याने वाहतूक खोळंबली होती. त्याचबरोबर तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी गावच्या मध्यभागी असणाऱ्या ओढ्यला पूर आला असून वेळापूर गावचे बाजार तळ त्याचबरोबर ओढ्याच्या कडेला असणाऱ्या घरांपर्यंत ओढ्याच्या पात्रातील पाणी पसरले आहे. 
Continues below advertisement
विदर्भातील अनेक भागात पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त 

विदर्भातील अनेक भागात पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त, 


पुढील ३ तास चंद्रपुरातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस ,


गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि नागपुरातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज,

पार्श्वभूमी

मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईला चांगलंच झोडपलं. अशातच 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


पुढील चार ते पाच दिवस कोकणात अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. त्यामुळे मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. 





विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल. अकोला, भंडारा, वाशिम, गडचिरोली आणि गोंदियातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 



दरम्यान रत्नागिरीत शुक्रवारी (11 जून) सकाळी साडेआठ वाजल्यापासून रात्रीपर्यंत 92.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सांताक्रूजमध्ये 51.4 मिमी पाऊस पडला. 


मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज अलर्ट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन


मान्सूननं मुंबईत धमाकेदार एन्ट्री केली असून मुंबई आणि उपनगरांत आणखी काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अशातच आज मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला होता. मात्र, तो आता ऑरेंज अलर्टमध्ये बदलण्यात आला आहे. अरबी समुद्रातील सायक्लॉनिक सर्क्युलेशन कमकुवत झाल्याने अलर्ट बदलवण्यात आला आहे. ज्यात मुख्य: पावसाचा अधिकतम पट्टा हा मुंबईच्या दक्षिणेत सरकल्याने रायगड आणि रत्नागिरीत अतितीव्र पावसाची शक्यता आहे. दरम्यान, असं जरी असलं तरी आज मुंबई आणि उपनगरात तीव्र पाऊस अपेक्षित आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट कायम ठेवण्यात आल्याने तेथील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 


पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गात आज ऑरेंज अलर्ट असल्याने काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील तीन दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.