Mumbai Rain Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटांनी उशीराने...

Mumbai Rain Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) सुरु आहे. जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

abp majha web team Last Updated: 30 Jun 2023 01:26 PM

पार्श्वभूमी

Mumbai Rain Live Updates : आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) सुरु आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परीणाम झाला आहे. ठाणे, मुंबई,...More

पालघर जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी पाऊस सुरु, शेतात पाणी साचल्यामुळं पेरण्या खोळंबल्या
Palghar Rain : पालघर जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं जिल्ह्यातील नदीनाले भरून वाहायला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा आणि पिंजाळ या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. पाऊस सुरू झाल्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या भात पेरण्या सुरू केल्या होत्या. पण सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं आणि शेतात पाणी साचल्यामुळं त्या पेरण्याही आता खोळंबल्या आहेत. झालेल्या पेरण्याही अतिपावसामुळं आणि पुरामुळं वाया जाण्याची शक्यता आहे.