Mumbai Rain Live Updates : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
Mumbai Rain Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) सुरु आहे. जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Mumbai Rain : वसई-विरारासह नालासोपाऱ्यात मागच्या तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा अधूनमधून जोर वाढल्याने विरार पश्चिम विवा कॉलेजचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावर गुडगाभर पाणी साचल्याने त्यातून मार्ग काढताना वाहनधाराक, शाळकरी मुलांना मोठी कसरत करावी लागत आहे. वसई विरार शहरात कुठेही पाणी साचणार नाही, असा दावा महापालिकेने केला होता पण पण वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयासमोरील विवा कॉलेज रस्त्यावर साचलेल्या पाण्याने पालिकेचा दावा फेल गेला आहे.
Mumbai Rain : मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील मागाठाणे मेट्रोस्थानकाच्या शेजारील खासगी इमारतीचे बांधकाम सुरु असताना जमीन खाली खचली. मुसळधार पावसातच काम सुरु असल्यामुळे ही जमीन खाली खचली गेली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, ही जमीन खचल्यामुळं मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ महापालिकेच्या अतिरिक्त येणारा रस्ता देखील खचला आहे. त्यामुळं रस्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेट्रो उत्तरेकडचे प्रवेशद्वार तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत बिल्डरवर गुन्हा दाखल आणि दोन जणांना अटक करण्यात आलीय.
Mumbai Rain : काल झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 24 तासात 1.68 % ने पाणीसाठा वाढला
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये काल 7.26 टक्के पाणीसाठा होता
तर 24 तासात झालेल्या मुसळधार पावसानंतर हाच पाणीसाठा 8.94 टक्के झाला आहे
मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारे सात धरण आणि भातसा धरणातील शिल्लक पाणीसाठा मिळून मागील 24 तासात 12.57 % हुन वाढून 14.61 % झाला आहे. म्हणजे एकूण पाणीसाठा मध्ये जवळपास 2.04 टक्के पाणीसाठा वाढला आहे
कोणत्या धरणात मागील 24 तास किती टक्के पाणीसाठा वाढला?
उप्पर वैतरणा - 00%
मोडक सागर- 3.1 %
तानसा - 3.11%
मध्य वैतरणा- 2.65 %
भातसा - 1.02%
विहार - 4.61%
तुळसी -7.18 %
यामध्ये तुळसी आणि विहार धरणामध्ये मागील 24 तासात सर्वाधिक पाणीसाठ्यात वाढ झाली आहे
मुंबई महापालिकेने एक जुलैपासून दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतलेला असताना धरण क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसात दमदार पावसाला सुरुवात झाली असताना पुढील दिवसांमध्ये अशाच पद्धतीने धरण क्षेत्रात पाऊस पडल्यास जुलै च्या पहिल्या आठवड्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन या निर्णयासंदर्भात फेरविचार करू शकते
मात्र सध्या तरी एक जुलैपासून मुंबईमध्ये पाणी कपातीचा निर्णय लागू करण्यात आलेला आहे
Rain : सातारा जिल्ह्यातील मेटतळे गावाजवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
Rain : कल्याण डोंबिवलीमध्ये रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र अधून मधून पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत.
Thane Rain : ठाणे शहरात काल संध्याकाळपासून बरसणाऱ्या मुसळधार पावसाने आज सकाळच्या समोरच काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यातच काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत ठाणे शहरात 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Mumbai Rain : मिरा-भाईंदर आणि वसई विरार शहरात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. आजही या परिसरात ऑंरेज अलर्ट आहे. भाईंदरच्या उत्तन येथील डोंगरी झांबिरी जवळ आईस फॅक्ट्री बसस्टॉप येथे कालपासून तीन ते चार ठिकाणी मुख्य रस्त्यावर दगड कोसळले आहेत. या 400 मीटरच्या रस्त्यावर दगडाची भिंत घातली आहे. संपूर्ण डोंगरावरच पाणी या भिंतवरुन वाहत आहे. त्यामुळे भिंतीला प्रेशर येवून भिंतीचे दगड कोसळले आहेत. रस्त्याच्या कडेलाच दगड कोसळल्याने राञीच्या सुमारास तेथे अपघात होण्याची शक्यता येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मिरा भाईंदरच्या आपत्ती व्यवस्थापनाने यांची गंभीर दखल घेवून रस्त्याच्या कडेचे दगड लवकरात लवकर उचलण्याची मागणी स्थानिक माजी नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी व्यक्त केलं आहे.
Mumbai Rain : मुंबईतील भायखळामध्ये मध्यरात्री अडीचच्या सुमारास झाड खाली पडल्यामुळं एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मध्यरात्री भायखळा इंदू ऑइल मिल कंपाउंडमध्ये घरात पाच ते सहा जण झोपले होते. रात्री अडीचच्या सुमारास एक झाड खाली घरावर पडल्यामुळं रहमान खान वय 22 वर्ष याची दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्याच्या साथीदार रिजवान खान 20 वर्ष गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जे जे रुग्णालय मध्ये उपचार सुरू आहेत.
पार्श्वभूमी
Mumbai Rain Live Updates : आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) सुरु आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परीणाम झाला आहे. ठाणे, मुंबई, दिवा, कळवा, मुंब्रा या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामामुळं ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
वाहतूक कोंडी झाल्यामुळं रिक्षावाले आणि सामान्य नागरिक हे वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरत आहेत. मोठी वाहतूक कोंडी झाल्यामुळं चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाकडून कोणत्याच प्रकारचं नियोजन करण्यात आलं नाही.
मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला
मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये सकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळं सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पावसाचा जोर ओसरल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत नाही. मात्र एलबीएस रोडवर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पूर्व उपनगराप्रमाणेच ठाण्यात देखील सकाळपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रापासून ते अगदी अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळतेय. अंधेरी बोरिवली दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा पश्चिम द्रुतगती मार्गावर पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची काम सुरू असल्याने आणि दुसरीकडे अधून मधून जोरदार पाऊस पडत असल्याने या वाहतूक कोंडीतून मुंबईकर मार्गस्थ होत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -