Mumbai Rain Live Updates : पालघर मनोर रोडवरील सूर्या नदीवर असलेला मासवनचा जुना पूल पाण्याखाली

Mumbai Rain Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) सुरु आहे. जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

abp majha web team Last Updated: 28 Jun 2023 09:39 PM
Palghar Rain Updates: पालघर मनोर रोडवरील सूर्या नदीवर असलेला मासवनचा जुना पूल पाण्याखाली

Palghar Rain Updates: पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. तर पालघर मनोर रोडवरील सूर्या नदीवर असलेला मासवनचा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.

Mumbai Rain : कल्याण डोंबिवलीत पावसाचा जोर , अनेक ठिकाणी पाणी साचले

आज सकाळपासून कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पावसाचा जोर आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसर ,डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर ,मानपाडा पोलीस स्टेशन अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नालेसफाईचा दावा केला होता, तो नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. आज सकाळपासून पावसाची नोंद 47 मिली मीटर नोंद झाल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापनने दिली आहे. त्याच प्रमाणे जून महिन्यामध्ये एकूण 201 मिली मीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रशासन दिली आहे.

Mumbai rain Updates : मागील 6 तासांची पावसाची आकडेवारी

मागील 6 तासांत पावसाची आकडेवारी
(सकाळी 8.30 पासून दुपारी 3 वाजेपर्यंत)


मुलुंड : 154 mm
दहिसर : 152
माजीवडा : #Thane 146
बोरीवली : 144
मुंब्रा : 132
बदलापूर : 130
मानपाडा : 120
ऐरोली : 109
डोंबिवली : 102

Thane Rain Updates : ठाण्यातील खोपट इथे वडाचे झाड कोसळले

Thane Rain Updates : ठाण्यातील खोपट इथे वडाचे झाड कोसळले, झाडाखाली एक रिक्षा आणि एक चारचाकी अडकली, झाड बाजूला करण्याचे काम सुरू

Mumbai rain Updates : मागील 6 तासांची पावसाची आकडेवारी

मागील 6 तासांत पावसाची आकडेवारी
(सकाळी 8.30 पासून)

कुलाबा - 72.5 मिमी
भायखळा - 28 मिमी
वरळी - 26 मिमी
वांद्रे - 37 मिमी
चेंबूर - 50 मिमी
दादर - 17 मिमी
जुहू विमानतळ - 67 मिमी
मुंबई विमानतळ - 86.5 मिमी
विलेपार्ले - 53 मिमी
अंधेरी - 57 मिमी
विक्रोळी - 57 मिमी
मरोळ - 60 मिमी
जोगेश्वरी - 64 मिमी
कांजूर मार्ग - 67 मिमी
दिंडोशी - 73 मिमी
बोरीवली - 143 मिमी
दहिसर - 152 मिमी
मुलुंड - 48 मिमी
मुंब्रा - 135 मिमी
चिराग नगर, ठाणे - 142 मिमी
माजिवाडा - 133 मिमी
ढोकळी - 125 मिमी
ऐरोली - 108 मिमी

वाशी - 60 मिमी
डोंबिवली पश्चिम - 103 मिमी
डोंबिवली पूर्व - 94 मिमी
कल्याण - 62 मिमी

mumbai rains news : बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा भुयारी मार्ग पाण्याखाली 

Badlapur Rain : बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा भुयारी मार्ग पाण्याखाली 


बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर शहरात मुसळधार पाऊस


बेलवली भागातील रेल्वे रुळाखाली भुयारी मार्ग पाण्यात


नागरिक आणि वाहन चालक जीव मुठीत धरून प्रवास 


भुयारीच्या बाजूला असणारा नाला तुंबूड भरून वाहू लागला


नाल्यातील पाणी भुयारी मार्गावर आल्याने मार्ग पाण्याखाली 


अंबरनाथ बदलापूर परिसरात अनेक सकल भागांमध्ये पाणी शिरलं

Rains Mumbai Today : ठाण्यात पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणी, काही ठिकाणी वाहतूक कोंडी..

Thane Rain : ठाण्यात यंदाच्या वर्षीही नालेसफाई आणि गटार सफाईची पोलखोल पावसानं केली आहे. चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं ठाण्यातील विविध परिसरात पाणी भरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. ठाण्यातील वंदना सिनेमा परिसर, खारकराळी परिसर, जांभळी नाका परिसर, केसरमिल, कळवा पूर्व, मुंब्रा, दिवा या ठिकाणी सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पाहायला मिळाले आहे. त्यामुळं सकाळच्या सुमारास नोकरीवर जाणाऱ्या चाकरमान्यांची मात्र दाणादाण उडालेली पाहायला मिळाली आहे. सकाळच्या सुमारास तारेवरची कसरत करून चाकरमान्यांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. तर या साचलेल्या पाण्यामुळे ठाण्यात ठीक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली.

Rains in Mumbai Today : मुसळधार पावसामुळं घाटकोपरमधील असल्फा मेट्रो स्थानक परिसरात साचलं पाणी

Mumbai Rain : सकाळपासून मुंबई परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं घाटकोपरमधील असल्फा मेट्रो स्थानक परिसरात पाणी साचलं आहे. 

अहमदाबादकडून मुंबईच्या दिशेला येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Mumbai Rain : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काशिमीरा हद्दीतील फाऊंटन नाका इथं आज सकाळपासून मुंबईकडून ठाण्याचा बाजूला जाणार मार्ग आणि अहमदाबादकडून मुंबईच्या दिशेला येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक पोलीस भर पावसात देखील वाहतूक नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. फॅान्टन हॅाटेल जवळील सिटी हॅाटेल समोर नायगावपर्यंत महामार्गावर पाणी साचलं आहे. या पाण्यातून मार्ग काढताना वाहतूक कोंडी होत असून वाहतूक संथगतीने सुरु आहे.

Mumbai Rain : मालाड परिसरात झाड पडल्यानं 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Mumbai Rain : मालाड पश्चिम येथील मामलेदारवाडी परिसरात झाड कोसळून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कौशल महेंद्र जोशी वय 33 असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात मणिभाई मुंजी चाळ येथे सुमारे 35 फूट उंच आणि चार फूट रुंदीचे एक पिंपळाचे झाड कोसळले. झाडाचा वजनदार भाग डोक्यावर पडल्यामुळं बुधवारी पहाटे कौशल दोषी यांचा जागीच मृत्यू झाला.

अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, मुसळधार पावसामुळे सबवे खाली दोन ते तीन फूट पाणी

Mumbai Rain : मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे खाली दोन ते तीन फूट पाणी भरले आहे. त्यामुळं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सध्या अंधेरी सबवे बाहेर मुंबई पोलिसांचा आणि मुंबई महानगरपालिकेचे लाईफ गार्ड तैनात करण्यात आले आहेत.



सततच्या पावसामुळं विक्रोळीतील सिद्धार्थ चाळ परिसरातील संरक्षण भिंत कोसळली, परिसरात भीतीचे वातावरण

Mumbai Rain :  सतत सुरु असलेल्या पावसामुळं विक्रोळी पश्चिम सुर्यनगरमधील सिद्धार्थ चाळ परिसरातील संरक्षण भिंत कोसळली आहे.  ही भिंत विभागातील नागरिकांसाठी बसण्यासाठी असणाऱ्या शेडवर पडली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Navi Mumbai : सिवूडमध्ये पार्किंग भिंत पडली, तीन गाड्यांचे नुकसान 

Navi Mumbai : सिवूड येथील एनआरआय कॅाम्पलेक्स मधील पार्किंग भिंत पडली 


भिंत पडल्याने तीन गाड्यांचे नुकसान 


भिंतीचा भाग कारवर आदळला


या घटणेत कुणीही जखमी नाही 


सततच्या पावसामुळे घडली घटना

Mumbai Rain : मुंबईत सर्वत्र पाऊस सुरु, किंग सर्कलसह गांधी मार्केट आणि दादर परिसरात पालिकेनं घेतली खबरदारी

Mumbai Rain : मुंबईत सध्या सर्वत्र पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं आहे. मात्र, नेहमीप्रमाणं थोड्याच पावसात किंग सर्कल, गांधी मार्केट, सायन माटुंगा आणि दादर या परिसरामध्ये पावसाचं पाणीच साचते. परंतु आज या परिसरात आतापर्यंत पाणी साचलेलं नाही. कारण यावेळी या परिसरात पाणी साचू नये यासाठी महापालिकेने विशेष खबरदारी घेतलेली आहे. 

जोरदार पावसामुळं अंधेरी पूर्व मरोळ भागातील साईबाबा नगर परिसरात पाणी भरायला सुरुवात

Mumbai Raiin : मुंबईत सुरु सकाळपासून असलेल्या जोरदार पावसामुळं अंधेरी पूर्व मरोळ भागातील साईबाबा नगर परिसरात पाणी भरायला सुरुवात झाली आहे.

Mumbai Rain : अंधेरी पश्चिमेत एस.वी रोडवर पाणी भरायला सुरुवात

Mumbai Rain : मुंबईत सुरू असलेला मुसळधार पावसामुळे अंधेरी पश्चिमेत एस.वी रोडवर पाणी भरायला सुरुवात. एस बी रोडवर पाणी भरल्यामुळे अंधेरी पश्चिमेत वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

पाहा मागील तीन तासात मुंबईत पडलेल्या पावसाची आकडेवारी 

ठाणे - 50.04 मिमी 
कुलाबा - 54 मिमी 
दिंडोशी - 39 मिमी 
कासारवडवली - 44 मिमी 
डोंबिवली पश्चिम - 35 मिमी 
डोंबिवली पूर्व - 31 मिमी
मुंब्रा - 48  मिमी 
ऐरोली - 41 मिमी 
मुंबई विमानतळ - 38 मिमी

Mumbai Rain : पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai Rain : पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. विक्रोळी गोदरेज कंपनी ते छेडानगर जंक्शन आणि चेंबूर फ्लायोव्हर ते सुमननगर फ्लयोव्हरपर्यंत वाहतूक कोंडी आहे. अतिशय धीम्या गतीने गाड्या पुढे सरकत आहेत.

दहिसर पूर्व स्टेशन रोड परिसरात साचलं पाणी

Mumbai Rain : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दहिसर पूर्व स्टेशन रोड परिसरात आणि दहिसर पोलीस स्टेशनचे समोर मुख्य रस्त्यावर पाणी साचलं आहे.

दहिसर टोल नाक्याजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली सखल भागात साचलं पाणी

Mumbai Rain : दहिसर टोल नाक्याजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली सखल भाग असल्यामुळं पाणी भरायला सुरुवात झाली आहे. त्या भागात वाहतूक कोंडी झाली आहे.

पार्श्वभूमी

Mumbai Rain Live Updates : आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) सुरु आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परीणाम झाला आहे. ठाणे, मुंबई, दिवा, कळवा, मुंब्रा या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामामुळं ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


वाहतूक कोंडी झाल्यामुळं रिक्षावाले आणि सामान्य नागरिक हे वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरत आहेत. मोठी वाहतूक कोंडी झाल्यामुळं चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाकडून कोणत्याच प्रकारचं नियोजन करण्यात आलं नाही. 


मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला


मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये सकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळं सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पावसाचा जोर ओसरल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत नाही. मात्र एलबीएस रोडवर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पूर्व उपनगराप्रमाणेच ठाण्यात देखील सकाळपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रापासून ते अगदी अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळतेय. अंधेरी बोरिवली दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा पश्चिम द्रुतगती मार्गावर पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची काम सुरू असल्याने आणि दुसरीकडे अधून मधून जोरदार पाऊस पडत असल्याने या वाहतूक कोंडीतून मुंबईकर मार्गस्थ होत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.