मुंबई : मुंबई आणि परिसरात रविवार रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. पावसाचा लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला असून तिन्ही रेल्वेमार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरु आहे. शिवाय रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम जाणवला. दुपारी 12.38 वाजता : मालाडमध्ये एव्हरशाईन नगर परिसरात नाल्यात पडून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू दुपारी 12.30 वाजता : 1 ते 24 जून या काळात राज्यात सरासरी 143.4 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 185.5 मिलीमीटर म्हणजेत 29 टक्के जास्त पावसाची नोंद सकाळी 11.35 वाजता : सकाळी 10.25 वाजता : सकाळी 10.16 वाजता : वडाळ्यातील अँटॉप हिल परिसरात दोस्ती पार्क इमारतीजवळ रस्ता खचल्याची घटना घडली. रस्ता खचल्यामुळे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. या घटनेत सहा गाड्यांचं नुकसान झालं आहे. काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती सकाळी 9.59 वाजता : गेल्या 24 तासात पावसाने 200 मिमी पावसाचा टप्पा ओलांडला. सांताक्रुझ वेधशाळेत 231 मिमी पावसाची नोंद. पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा 'स्कायमेट'चा इशारा सकाळी 9.42 वाजता : सायन भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची धांदल उडाली आहे. सायन, कुर्ला, ठाणे परिसरात लोकलच्या ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेसोबतच पश्चिम, हार्बर मार्गावरही वाहतूक विस्कळीत आहे. जेव्हीएलआरमध्ये कंटेनरचा अपघात झाल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. चेंबुरमध्ये काही घरांमध्येही पाणी शिरलं आहे, तर बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची भिंत कोसळून वाहनांचं नुकसान झालं आहे. माटुंग्यातील काही सोसायटींमध्ये पाणी शिरलं. दुसरीकडे पालघरमध्येही जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकमान्य पाड्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे.