मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला. रेल्वे बजेटमध्ये मुंबईच्या रेल्वे प्रकल्पांसाठी एमआरव्हीसी (मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन) ला 11 हजार कोटींचा निधी मिळाला आहे.
विरार डहाणू चौपदरीकरण- 126 ट्रॅक किलोमीटर- 3578 कोटी
पनवेल कर्जत नवीन मार्ग- 56 ट्रॅक किलोमीटर- 2783 कोटी
ऐरोली आणि कळवा नवीन मार्ग- 8 ट्रॅक किलोमीटर- 476 कोटी
लोकल डब्यांची निर्मिती - 565 लोकलचे डबे -3491 कोटी ( सर्व डबे वातानुकूलित)
रेल्वे रुळ ओलांडू नये (ट्रेस पासिंग) यासाठी 22 ठिकाणी उपाययोजना - 551 कोटी
तांत्रिक गोष्टींसाठी 69 कोटी
एकूण 10,947 कोटी.
बजेटमध्ये जे 11 हजार कोटी रुपये सांगितले, ते प्रोजेक्ट एमयूटीपी 3 च्या अंतर्गत एमआरव्हीसी पूर्ण करेल. यानंतर एमयूटीपी 3 एचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, जो 49 हजार कोटींचा होता. त्यासाठी 40 हजार कोटी किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत, मात्र 5 तारखेला जेव्हा पिंक बुक येईल तेव्हाच याबद्दल अधिकृतरित्या सांगण्यात येईल.
या दोन्ही प्रोजेक्टला मिळून अंदाजे 51 हजार कोटी मुंबईला मिळाले, असं आपण म्हणू शकतो.
एमयूटीपी 3 ए मध्ये कोणते मोठे प्रोजेक्ट?
सीएसएमटी ते पनवेल एलिवेटेड फास्ट कॉरिडोर
पनवेल ते विरारमध्ये नवीन मार्गिका
हार्बर लाईनचे गोरेगावपासून बोरीवलीपर्यंत विस्तारीकरण
बोरीवली आणि विरारमध्ये पाचवी आणि सहावी मार्गिका
कल्याण आणि आसनगावच्या मध्ये चौथी मार्गिका
कल्याण आणि बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका
लोकल आणि एक्स्प्रेससाठी कल्याणमध्ये वेगळे यार्ड बांधणे
वातानुकूलित डबे बनवणे, स्टेशन सुधारणे, लोकल डब्यांच्या डागडुजीसाठी सुविधा निर्माण करणे, स्टॅबलिंग लाइन टाकणे या आणि अश्या इतर प्रकल्पांचा समावेश या एमयूटीपी 3 ए मध्ये आहे