Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर खोपोली हद्दीत आज पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. या भीषण अपघातात  सोलापूरमधील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव खरात यांच्यासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चळवळीतील कार्यकर्ता अशी ओळख असलेले गौरव खरात यांच्या अपघाती मृत्यूमुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या अपघातात मृत झालेले तिघे सोलापूरचे असून एक तुळजापूर येथील आहे.  या अपघातात जखमी झालेले इतर तिघे जालना जिल्ह्यातील आहेत. 


पहाटेच्या सुमारास एक्सप्रेसवेवर खोपोली एक्झिटजवळ मुबंईकडे जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने कंटेनरने पुढे जाणाऱ्या स्वीफ्ट कारला धडक दिली. यात चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, स्वीफ्ट कारने या पुढे जाणाऱ्या आयशर टेम्पोला आणि टेम्पोने पुढील कारला जोरदार धडक दिली. यामुळे या कारमधील जालना जिल्ह्यातील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या कारनेही पुढे जाणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. मात्र हा कंटेनरचा मुंबईकडे निघून गेला.


पाहा व्हिडीओ



 


या अपघातात स्वीफ्टकार मधील गौरव गौतम खरात, सौरभ तुळसे, सिद्धार्थ मल्लीक राजगुरु आणि मयुर दयानंद कदम हे जागीच ठार झाले तर, पवन अग्रवाल, मितेश वडोदे, अस्लम शेख हे तिघे प्रवासी किरोळ जखमी झाले आहेत. या जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहीती मिळताच आय. आर. बी. यत्रंणा, महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्सने घटनास्थळी मदतकार्य सुरु केले. अपघातग्रस्त दोन कारचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला. या दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला करुन दुर्तगती मार्ग मोकळा करण्यात आला. 


या अपघातात कंटेनरचा ब्रेक फेल होऊन पुढील वाहनांना धडक देण्याची मालिका सुरु झाली. तर सर्वात पुढे असणारा म्हणजेच शेवटची धडक बसलेला कंटेनरला पाठीमागुन धडकलेल्या वाहनांची माहिती नसल्याने कंटेनर मुबंईकडे निघून गेला. हा अपघात लेनची शिस्त आणि उताराची काळजी न घेतल्याने झाल्याची माहीती बचावलेला प्रवासी अस्लम शेख याने दिली. पुढील तपास खोपोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेष कळसेकर करत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha