Mumbai Powai Fire : मुंबईतील (Mumbai) पवई परिसरात एका शॉपिंग मॉलला आग लागली आहे. पवईच्या हिरानंदानी (Hiranandani Powai Area) मधील हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आगल्याची माहिती मिळत आहे. सकाळी सहा वाजण्याच्या आसपास आग लागल्याची घटना घडली. आगाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एक वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, आगीत सामग्रीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पण अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.


हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला लागलेली आग खूपच भीषण आहे. अद्यापही आग धुमसतीच आहे. अग्निशमन दलाला लेव्हल 2 चा कॉल देण्यात आला आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या उपस्थित आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 


कालपासूनच मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. अशातच पवईतील हिरानंदानी परिसरात ही भीषण आग लागली आहे. आग मोठी असल्याची माहिती स्थानिकांच्या वतीनं देण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मॉलमधील लाखोंची सामग्री जळून खाक झाली आहे. 


पवईच्या हीरानंदानीमध्ये किती वाजता लागली आग? 


मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "पवईच्या हिरानंदानी परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सुपरमार्केटमध्ये सकाळी जवळपास सहा वाजून 15 मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली होती. ज्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.  सध्या आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. 



अद्याप कोणतीही जीवितहानी नाही 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण लाखोंची सामग्री जळून खाक झाली आहे. अद्याप आगीचं कारण अस्पष्टच आहे. दरम्यान, पवई म्हणजे, मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांपैकी एक. हा परिसर उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेला परिसर आहे. सध्या अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :