मुंबई : मराठी कलाकारांच्या होळीवर मुंबई पोलीसांनी आक्षेप घेतला आहे. रीतसर परवानगी असून देखील शिवाजी पार्क पालिसांनी मराठी कलाकारांच्या होळीवर कारवाई करण्याचे इशारा दिला आहे.
मराठी कलाकारांच्या ‘रंगकर्मी’ या संस्थेमार्फत शिवाजी पार्क परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पण शांतता क्षेत्र असल्याने येथे स्पिकर लावता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पण आमच्याकडे परवानगी असूनदेखील आमच्या आक्षेप का? असा प्रश्न अमेय खोपकर यांनी विचारलाय. तसेच ही जागा खाजगी असल्याचेही खोपकर यांनी सांगितलं.
रीतसर परवानगी काढूनही पोलिसांनी कारवाईची धमकी, अमेय खोपकर यांची प्रतिक्रिया
‘रंगकर्मी’ या संस्थेमार्फत सर्व मराठी कलाकार एकत्र येत ही होळी साजरी करतो. गेली अनेक वर्षे आम्ही हा सण साजरा करतो आहे. पण या वेळी पोलिसांनी आमच्या या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. मुळात ही जागा खासगी असून या जागेला शांतता क्षेत्राचा नियम लागू शकत नसल्याचं अमेय खोपकरांनी सांगितलं. आम्ही रीतसर परवानगी काढूनही पोलिसांनी कारवाईची धमकी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त यात लक्ष घालण्याची विनंती अमेय खोपकर यांनी केली आहे.
पोलिसांनी कारवाईवर अभिनेता सुशांत शेलारची नाराजी
कलाकार पोलिसांच्या बरोबर नेहमीच असतात. पण आजच्या कार्यक्रमाची सर्व तयारी झाली असताना पोलिसांनी अचानक परवानगी नाकारली असून यावर अभिनेता सुशांत शेलारने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस आयुक्तांना विनंती आहे की आम्हाला आमची होळी खेळू देण्याची विनंती सुशांतने केली आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठी कलाकारांच्या होळीवर पोलिसांचा आक्षेप, अमेय खोपकर, सुशांत शेलार यांची नाराजी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Mar 2019 12:39 PM (IST)
आमच्याकडे परवानगी असूनदेखील आमच्या आक्षेप का? असा प्रश्न अमेय खोपकर यांनी विचारलाय. तसेच ही जागा खाजगी असल्याचेही खोपकर यांनी सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -