मुंबई : मुंबई पोलीस दलात ‘जादूगार’ म्हणून ओळख असलेले पोलीस अधिकारी सुभाष दगडखैर रविवारी 38 वर्षांच्या पोलीस सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. त्यांची पहिली ओळख एक उत्तम आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी तर दुसरी ओळख ही जादूगर म्हणून आहे. सुभाष दगडखैर यांना जादूच्या कलेसाठी दगडीकर यांना 117 अवॉर्ड मिळाले असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील यांच्या नावाची नोंद झालेली आहे.


सुभाष  दगडखैर 1982 साली पोलीस दलात भरती झाले. दगडीकर हे पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. 1999 साली सुभाष दगडीकरांची पोलिस उपनिरीक्षक पदी त्यांची नेमणूक झाली. गेल्या 40 वर्षांपासून  दगडखैर  यांना दमा आहे मात्र त्या दम्यावर मात करत अगदी काटेकोरपणे पोलिस अधिकार्‍याचा कर्तव्य त्यांनी बजावलं. या धापळीच्या आयुष्या त्यांनी कामाबरोबर आपला जादूगरीच छंद देखील जोपासला.

दमा असल्यामुळे डॉक्टरांनी  दगडखैराना कुठलातरी छंद बाळगा ज्याने तुमचे मन रमेल असा सल्ला दिला होता. त्यानंतर  दगडखैर यांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन  दगडखैर यांनी जादू शिकण्यास सुरुवात केली. कालांतराने ते या कलेमध्ये इतके निपून झाले की त्यांना या कलेसाठी आतापर्यंत 117 अवॉर्ड मिळाले. तसेच त्यांच्या जादुची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ही झाली आहे. सुभाष  दगडखैर  यांना वाचनाचाही छंद आहे आणि त्यामुळेच गेल्या पस्तीस वर्षात वेगवेगळ्या विषयांवर हजारपेक्षा अधिक पुस्तकं वाचून काढली आहेत.

निवृत्त होताना सुभाष  दगडखैर यांनी, ‘ज्याप्रमाणे शिक्षकांचा प्रश्न मांडणारा, कामगारांचा प्रश्न मांडणारा आमदार विधानसभेवर निवडून जातो त्याचप्रमाणे पोलिसांचा प्रश्न मांडणारा देखील विधानसभेवर निवडून जावा अशी इच्छा व्यक्त केली. दरम्यान निवृत्त होताना आणि आपल्या कर्मचाऱ्यांना बद्दल सांगताना  दगडखैर यांचे डोळे पाणावले होता.