मुंबई : शहरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येमुळं प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. मुंबईत 18 (आज मध्यरात्री) सप्टेंबरपासून कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत. मुंबईत 30 सप्टेंबरपर्यंत कलम 144 लागू राहणार आहे.
मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पुन्हा एकदा जमावबंदी संदर्भातील कलम 144 लावण्यात आला आहे. मात्र, हा कलम नव्याने लावण्यात आला नसून गेल्या वेळी जेव्हा हा कलम लावला होता. त्याचाच कालावधी वाढवला असल्याची मुंबई पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. 17 सप्टेंबर रात्री 12 वाजल्यापासून 30 सप्टेंबर रात्री पर्यंत मुंबईमध्ये कलम 144 लागू असणार आहे. कलम 144 अंतर्गत मुंबईमध्ये जमाव बंदी असणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या अनलॉक चार वर याचा परिणाम होणार नसल्याचे देखील मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आला आहे.
कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांकडून 28 लाखाचा दंड वसूल; नवी मुंबई मनपाकडून कारवाईची मोहीम
31 ऑगस्टपर्यंत मुंबई पोलिसांकडून कलम 144 लावण्यात आला होता आणि आज त्याची मुदत वाढ मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे. याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत लागू असणार असून मुंबईकरांनी एकमेकांमध्ये कमीत कमी 6 फूटच अंतर ठेवन सुद्धा बंधनकारक असणार आहे. या आदेशामुळे जनजीवन सुरळीत राहणार असून विनाकारण घरा बाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 75 हजार पेक्षाही वर गेली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत आठ हजारपेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे. म्हणून वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा नियम मोडणाऱ्यानवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, राज्य सरकारद्वारे अनलॉक फोरची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि इमर्जन्सी सेवा सुरू राहणार आहे.
Aarey car shed | मुंबई मेट्रो कारशेडच्या कामावर आतापर्यंत 450 कोटी रुपये खर्च