मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वांद्रा येथे मोठी कारवाई करत 3 पिस्तूल 1 मॅगझीनसह जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मध्यप्रदेशातून विक्रीसाठी हा शस्त्र साठा आणण्यात आला होता. अटक आरपीचं नाव प्रल्हाद बोरडे असं आहे. नेमकी ही शस्त्र कोणाला विकणार होता आणि याचे ग्राहक कोण याची चौकशी आता गुन्हे शाखा करत आहेत.


मुंबईकर नवीन वर्षाच्या जल्लोषात असतांना मुंबई पोलीस मात्र हाय अलर्ट होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 8 च्या अधिकाऱ्यांना आपल्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, वांद्रा येथील निर्मल नगर पोलोस ठाण्याच्या हद्दीत वांद्रे टर्मिनस या ठिकाणी एक युवक काही शस्त्र विकण्यासाठी संध्याकाळी येणार आहे. गुन्हे शाखेने या ठिकाणी सापळा लावला आणि खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून एक युवक एक पिशवी घेऊन त्या ठिकाणी आला. पोलिसांनी त्याची चौकशी करून तपासणी केली असता पिशवीत असलेल्या एका उशीमध्ये पिस्तूल, मॅगझीन अशी अवैधरित्या बाळगलेली शस्त्रे आढळली. त्यांनतर त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता ती विक्रीसाठी मध्यप्रदेश येथून आणली होती. ही शस्त्रे मुंबईत 3 लाख 75 हजार रुपयाला विकणार होता अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली


गेल्या काही दिवसात मुंबईत अवैध शस्त्र साठा विक्री करणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकत आहेत. पण ही शस्त्रे नेमकी कुठून येतात आणि मुंबईत याचे ग्राहक कोण आहेत याचा शोध पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. अन्यथा मुंबईत पुन्हा एकदा गँगवार होऊ शकते अथवा अतिरेकी आपले काम फत्ते करू शकतात हे निश्चत.