मुंबई: अॅन्टी करप्शन ब्यूरोने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी पोलीस कॉन्सटेबल आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कॉन्स्टेबलकडे तब्बल 2.77 कोटीची संपत्ती जमवल्याचे समोर आले आहे.


एसीबीला पोलीस कॉन्स्टेबल नितीन श्रीरंग गायकवाड विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल होती. या तक्रारीची दखल घेऊन एसीबीने तपास सुरु केला.यावेळी एसीबीला गायकवाडकडे 883पट अधिक संपत्ती जमा असल्याचे आढळले. यामध्ये फ्लॅट, दागिने आदींचा समावेश आहे.

गायकवाड जानेवारी 2008 ते नोव्हेंबर 2014 दरम्यान मुंबईच्या गुन्हे शाखेत कार्यरत होता. या प्रकरणी एसीबीने गायकवाडसोबत त्याची पत्नी मनिषा विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.