Mahavikas Aghadi Protest: कोणताही सण, उत्सव असो किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असो, घरातील भांडण असो की राजकीय मोर्चा महाराष्ट्र पोलीस (Maharshtra Police) हे नेहमीच आपल्या कर्तव्यासाठी तत्पर असतात. अशातच मुंबईत (Mumbai) आज महाविकास आघाडीचा महामोर्चा निघाला आहे. साहजिकच यासंदर्भातली कायदा आणि सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी मुंबई पोलिसांवर आणि पर्यायाने खात्याचे प्रमुख म्हणून पोलिस आयुक्त विवेक फणसळकर  (Vivek Phansalkar) यांच्यावर होती. 


पोलिस आयुक्त विवेक फणसळकर  (Vivek Phansalkar) हे एकीकडे आपले कर्तव्य निभावत असताना त्यांच्यासाठी आजचा दिवस कौटुंबिकदृष्ट्याही फार महत्त्वाचा आणि भावनिक आहे. त्यांच्या कन्येचं आज लग्न आहे. संध्याकाळी हा सोहळा पार पडणार आहे. साहजिकच मोर्चाचं नियोजन आणि त्यात कन्येच्या लग्नासाठीच्या तयारीची लगबग ही दुहेरी कसरत त्यांनी गेले दोन दिवस केली. घरामध्ये इतका मोठा क्षण साजरा होत असतानाच त्यांनी कर्तव्याला श्रेष्ठ मानत मोर्चाच्या नियोजनाला, तयारीला प्राधान्य दिलं, ज्याचं कौतुक आता सोशल मीडियावर करण्यात येतंय. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या या कामगिरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. 


Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar Daughter Marriage Today: कोण आहेत विवेक फणसळकर?


विवेक फणसळकर हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकात अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली आहे. आणि त्यापाठोपाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदीही ते होते. कडक शिस्त आणि प्रामाणिकपणा या त्यांच्या गुणांमुळे ते खात्यात ओळखले जातात. फणसळकर यांची 31 जुलै 2018 रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती, त्यांची ठाण्यातील उत्तम कामगिरी पाहता राज्य शासनाने त्यांची बदली न करता मुदतवाढ दिली होती. सुमारे पावणे दोन वर्ष  त्यांनी ठाणे शहर आयुक्त  पदाचा कार्यभार सांभाळला. सध्या ते मुंबई पोलीस आयुक्तपदी ( Mumbai police commissioner)  आहेत.


दरम्यान, राज्यात आज महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानांविरोधात महाविकास आघाडी कडून (Maha Vikas Aghadi) महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात आला होता. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून या मोर्चाची सुरुवात भायखळ्यातील रिचर्डसन्स रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून झाली आणि बोरीबंदर येथील टाईम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगजवळ (Times Of India Building) मोर्चा थांबला. या मोर्चाच्या अनुषंगाने आज वाहतूक व्यवस्थेत (Mumbai Traffic Updates) बदल करण्यात आले होते. या मोर्च्यसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.