ATM मधून परस्पर रोकड पळवणाऱ्या दोघांना अटक
एबीपी माझा वेब टीम | 18 Sep 2016 05:37 PM (IST)
मुंबईः एटीएमधारकांची लूट करणाऱ्या दोन भामट्यांना मुंबईतील भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी मुंबईसह, नवी मुंबई आणि देशभरात अनेक ठिकाणी मोठे गुन्हे केले असल्याची पोलिसांना शंका आहे. दोन्ही आरोपी मूळ दिल्लीचे आहेत. एटीएम बिघडले असल्याचे सांगत आरोपींकडून एटीएम कीपॅडला चीप लावली जात असे. त्यानतंर खात्यातील रोकड लंपास केली जायची. आरोपींकडून केवळ मौजमजा करण्यासाठी असे गुन्हे केले जात होते. केवळ मीरा भाईंदरच्या नया नगर परिसरातच आरोपींनी सहा गुन्हे केले आहेत. खातेधारकांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढली जात असल्याच्या घटना सध्या समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई मानली जात आहे. हे आरोपी दिल्लीहून विमानाने हे जा करत होते. तसेच आयफोन 6 एस सारखे महागडे फोनही पोलिसांनी जप्त केले आहेत.