मुंबईत बेहरामपाड्यात पाईपलाईन फुटली, दोन मुलांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 07 Jul 2017 01:20 PM (IST)
मुंबई : मुंबईतील वांद्र्यातील बेहरामपाडा परिसरात पाईपलाईन फुटली. पाणी झोपड्यांमध्ये शिरल्याने दोन मुलांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. विघ्नेश डोईफोडे आणि प्रियांका डोईफोडे अशी नावं मृत मुलांची नावं आहे. मुलीचं वय 9 वर्ष तर मुलगा अवघ्या 8 महिन्यांचा होता. वांद्रे टर्मिनलजवळ आज सकाळी पाईपलाईनच्या दुरुस्तीचा काम सुरु असताना, दुसऱ्या पाईपलाईनमध्ये प्रेशर आलं. परिणामी 72 इंच व्यासाची पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं. शिवाय स्टेशनजवळच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरलं. पाण्याच्या या प्रवाहात दोन मुलं वाहून गेल्याने ते मृत्यूमुखी पडले.