नोटाबंदीविरोधात 23 हजार पतसंस्थांचा 'सहकार बचाव' महामोर्चा
एबीपी माझा वेब टीम | 01 Dec 2016 03:04 PM (IST)
मुंबई : राज्यातील पतसंस्था आज रिझर्व्ह बँकेवर 'सहकार बचाव' महामोर्चा काढाणार आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या आझाद मैदावरुन या मोर्चाला सुरुवात होणार असून तब्बल 23 हजार 203 पतसंस्थांचे कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले आहेत. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँका आणि पतसंस्थांवर या नोटा स्वीकारण्याबाबत निर्बंध घातले आहेत. या आदेशामुळे पतसंस्थांचे व्यवहार ठप्प झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या महामोर्चाला समर्थन देण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते प्रकाश सोलंकी उपस्थित आहेत.