Mumbai Omicron Latest Updates : धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जात असली तरी ओमायक्रॉन (Omicron) संकट देशात येऊन ठेपलं आहे. डोंबिवलीत काल एक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर आता धारावीवर देखील ओमायक्रॉनचं सावट आलं आहे. पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेला एक व्यक्ती धारावी येथे वास्तव्यास आहे. या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्याचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगकरता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवला आहे. अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहे. कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर या व्यक्तीला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी सध्या सुरु आहे. धारावीतील कोविड पॉझिटीव्ह व्यक्ती 49 वर्षीय आहे. दरम्यान यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटलं आहे की, धारावीनं यापूर्वीही शून्य रुग्ण आकडा अनेकदा गाठला आहे. धारावी लढलीय त्यामुळं घाबरुन जाऊ नये, असं त्यांनी म्हटलं आहे.
या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. धोकादायक देशामधून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवली जात आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पाच सूत्री अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.
काय आहे अॅक्शन प्लॅन?
एअरपोर्ट सीईओ कडून हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांची यादी आपात्कालीन कक्षाला पाठवली जाणार
प्रवाशांची यादी सोपी व्हावी यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती
हि आपात्कालीन कक्षाकडून मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डतील वॉर रूमला प्रवाशांच्या पत्त्यासह पाठवली जाणार
वॉर रूम मधून प्रवाशांची सतत 7 दिवस संपर्क ठेवण्यात येणार
विलगीकरणाचे नियम प्रवासी नीट पाळत आहे की नाही यांची खबरदारी घेतली जाणार
वॉर रूमने वॉर्डात 10 अॅम्ब्युलेंस तयार ठेवणार
महापालिकेची पथकही बनवली जाणार
महापालिकेची पथक प्रवाशांच्या घरी जावून देखील तपासणी करणार
प्रवासी राहत असलेल्या सोसायटीला पत्र दिलं जाणार
प्रवासी विलगीकरणाचे नियम पाळतो की नाही यावर पालिकेची बारीक नजर असणार
संबंधित फोटो
- Omicron : तुम्हाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं कसं ओळखणार? जाणून घ्या कसं शोधायचं या नव्या व्हेरियंटला
- Omicron Virus : ओमिक्रॉनशी लढण्याकरता मुंबई सज्ज, पालिका आयुक्तांची ग्वाही
- Omicron : लसीचे दोन्ही डोस न घेणाऱ्या मॉल, रेस्टॉरंटमधील व्यक्तींना 10 हजारांचा दंड लागणार; मुंबई पालिकेचा निर्णय