मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या  (BMC) कूपर रुग्णालयात (Cooper Hospital)  धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिकाऊ डॉक्टरने चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे एका 58 वर्षीय महिलेला आपली दृष्टी गमावावी लागली आहे. डॉक्टरने चुकीचे इंजेक्शन दिल्याने महिलेला दृष्टी गमवावी लागली असा आरोप महिलेच्या मुलाने केला आहे. या संदर्भात त्या मुलाने जुहू पोलिस ठाणे येथे तक्रार अर्ज दिला आहे 


अंधेरी पूर्वेकडील सहारगाव येथे राहणारी रमिला पुरुषोत्तम वाघेला या महिलेला गेल्या काही दिवसापासून डोळ्यामध्ये मोतीबिंदूचा त्रास होत होता. मोतीबिंदूच्या  शस्त्रक्रियेसाठी रमिला विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयामध्ये भरती झाली होती. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान कूपर रुग्णालयाच्या शिकाऊ डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन आणि औषध दिल्यामुळे रमिलाची  दृष्टी गेल्याचा आरोप महिलेच्या मुलाने केला आहे. 


या घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते इंतेखाब फारुकी यांनी पीडित कुटुंबीयांला कूपर रुग्णालयामध्ये (Cooper Hospital) जाऊन भेट घेतली. शिवसेना नेते (Shivsena)  इंतेखाब फारुकी यांनी जुहू पोलिसांकडे मागणी केली आहे की, संबंधित दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करावी अन्यथा पीडित कुटुंबियांसोबत कूपर हॉस्पिटलच्या बाहेर जोरदार आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.


 या प्रकारानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी प्रचंड संताप व्यक्त केला. महिलेला  दिलेल्या इंजेक्शनचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवले आणि रुग्णालय या संदर्भाक तपास करत आहे. हलगर्जीपणा समोर आल्याने  कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या हॉस्पिटकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 


संबंधित बातम्या :


निष्काळजीपणाचा कळस! मुंबईतील रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्याने दिले दोन वर्षाच्या मुलाला चुकीचे इंजेक्शन, मुलाचा दुर्दैवी मृत्यू