मुंबई : मुंबई-जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये (Jaipur Express Firing) चार जणांची हत्या करणारा आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याने एका बुरखा घातलेल्या महिलेला बंदुकीच्या धाकावर (Gun Point) 'जय माता दी' म्हणण्यास भाग पाडल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या बोरिवलीच्या जीआरपीला त्या महिलेने आपला जबाब दिल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
31 जुलै 2023 रोजी मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF जवान चेतन सिंहने केलेल्या गोळीबारात (Firing) चौघांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये आरपीएफ कर्मचारी आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. चेतन सिंहने AR-M1 रायफलने चौघांची हत्या केली होती. चेतन सिंह हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
संबंधित महिला ही एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरणातील प्रमुख साक्षीदार आहे. जीआरपी पोलिसांनी या महिलेची ओळख पटवली असून तिचा जबाब घेतला आहे. तसंच तपास पथकाने ट्रेनमधील काही सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले होतं. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या आणि गुन्ह्याचे साक्षीदार असलेल्या वेगवेगळ्या लोकांचे जबाबही जीआरपी पोलिसांनी नोंदवले आहेत.
'माझ्यावर बंदूक रोखून जय माता दी म्हणण्यास भाग पाडलं'
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन सिंह हा डब्यांमधून जात असताना त्याने B-3 कोचमधील बुरखा घातलेल्या महिला प्रवाशाला लक्ष्य केलं. जबाब महिलेने सांगितलं की, चेतन सिंहने माझ्यावर बंदूक रोखली आणि 'जय माता दी' म्हणण्यास भाग पाडलं. आपण जय माता दी म्हणूनही त्याचं समाधान झालं नाही. त्यामुळे त्याने मला पुन्हा मोठ्या आवाजात जय माता दी म्हणण्यास सांगितलं.
दरम्यान आरोपी चेतन सिंहच्या नियमित वैद्यकीय तपासणीत त्याला कोणताही गंभीर मानसिक आजार नसल्याचं स्पष्ट झालं आहे, असं जीआरपीने यापूर्वी सांगितलं होतं.
चेतन सिंहने चार जणांचा जीव घेतला
आरपीएफ शिपाई चेतन सिंहने त्याचे वरिष्ठ असलेल्या एएसआय टिकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांना गोळ्या घालून जीव घेतला. बी-5 कोचमध्ये टिकाराम मीणा, बी-4 कोचमधील मोहम्मद हुसेन बुरहानपूरवाला, पँट्री कारमध्ये असलेल्या सय्यद सैफुल्लाह मोईनुद्दीन असगर अब्बास शेख यांचीएकामागोमाग हत्या केली. त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास मीरा रोड स्थानकाजवळ प्रवाशांनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. यावेळी आरोपीने खाली उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जीआरपीने त्याला पकडलं.
हेही वाचा