Shivaji Park : मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानात महापालिकेनं खडी टाकल्यानं मनसेनं तिथं धरणं आंदोलन सुरु केलंय. माजी आमदार नितीन सरदेसाई आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरु केलंय. शिवाजी पार्कमध्ये खडी टाकून रस्ता बनवला जात असल्याचा आक्षेप मनसे आणि शिवाजी पार्क जवळच्या रहिवाशांनी घेतला आहे. यावरून शिवसेना आणि मनसेत शीत युद्ध सुरु आहे. 


मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानात महापालिकेनं खडी टाकल्यानं मनसेनं तिथं धरणं आंदोलन सुरु केलं आहे. माजी आमदार नितीन सरदेसाई आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरु केलं. शिवाजी पार्कमध्ये खडी टाकून रस्ता बनवला जात असल्याचा आक्षेप मनसे आणि शिवाजी पार्क जवळच्या रहिवाशांनी घेतला आहे. यावरून शिवसेना आणि मनसेत शीत युद्ध सुरु आहे. शिवाजी पार्कमध्ये कोणताही रस्ता होणार नाही, असं स्पष्टीकरण महापालिकेनं दिलं आहे. प्रत्यक्षात या खडीवर माती टाकण्यात येणार आहे. त्याखाली पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी ग्रव्हल्स टाकण्यात येत असल्याचंही महापालिकेनं स्पष्ट केलंय. पण मनसेनं त्याला आक्षेप घेतला आहे. 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवाजी पार्क परिसरातील नागरिक, क्लब सदस्य आणि खेळाडूंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. पालिकेकडून शिवाजी पार्क मैदानात सुशोभिकरणाचं काम सुरु आहे. हे काम सुरू असतानाच शिवाजी पार्क मैदानाच्या मधोमध मोठ्या प्रमाणात खडी टाकून रस्ता बनवण्यात आला आहे. याला मनसे आणि स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. सुशोभिकरणाला विरोध नसून मैदानात कुठल्याही कारणास्तव खडी नको, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. तर हे काम करताना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे तूर्तास हे काम थांबवण्यात आलं आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha