मुंबई : मुंबईत (Mumbai) निकृष्ट दर्जाच्या कामामुळे फूटपाथ खचल्याची घटना घडली. मुलुंड परिसरात फूटपाथ (Footpath) खचून झालेल्या दुर्घटनेमध्ये सहा दुचाकींचे (Bikes) नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी अचानक मुलुंडच्या (Mulund) केशव पाडा परिसरात एका इमारती समोरील फूटपाथ अचानक खचला. त्याखालील ड्रेनेज लाईनमध्ये या त्यावर उभ्या असलेल्या सर्व दुचाकी कोसळल्या. सुदैवाने या घटनेत कोणलाही दुखातप अथवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महत्त्वाचे म्हणजे दोन वर्षांपूर्वीच या फूटपाथचे काम करण्यात आलं होते. परंतु दोन वर्षातच निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे याचा काही भाग अचानक कोसळला. 


मुलुंडच्या पी के रोड परिसरात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. या परिसरातील फूटपाथच्या दुरुस्तीचं काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. मात्र शुक्रवारी रात्री अचानक हा फूटपाथ चार ते पाच फूट खचला. रात्रीच्या वेळी या फूटपाथवरुन कोणीही ये-जा करत नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र फूटपाथवर उभ्या असलेल्या दुचाकींचं मात्र मोठं नुकसान झालं.


सहा दुचाकींचं मोठं नुकसान


ही दुर्घटना घडली त्यावेळी या फूटपाथवरुन माणसांची फारशी वर्दळ नव्हती. म्हणून कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु या पाच फूट खोल असलेल्या ड्रेनेज लाईनमध्ये या फूटपाथवर पार्क केलेल्या सहा दुचाकी कोसळल्यामुळे या दुचाकींचे मोठं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण भाग हा सील केला आहे. ज्या कंत्राटदाराने असे निकृष्ट दर्जाचे फूटपाथ बांधले आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.


या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय महापालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान देखील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रस्ता रोधक उभे करुन दुर्घटनाग्रस्त फूटपथावर प्रवेश मनाई केली. 


निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी


दरम्यान या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. "ही घटना दुर्दैवी आहे. अडीच वर्षांच्या आत फूटपाथ खचतोय. मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारावर कारवाई व्हायला हवी, असं काम यापुढे व्हायला नको. या रस्त्यावर रहदारी असते, सुदैवाने फारशी वर्दळ नसल्याने जीवितहानी झाली नाही," अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे स्थानिक नेते उत्तम गीते यांनी दिली आहे.  


हेही वाचा


Goregaon-Mulund Link Road : दिलासादायक! गोरेगांव ते मुलुंड अंतर कमी होणार, जोडरस्त्याच्या अंतर्गत बोगद्याचं बांधकाम लवकरच होणार सरु