मुंबई : कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य किंवा कुठलेच लक्षण दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर अशा कोरोना रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवताना नेमक्या कोणत्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहेत ? याबाबत मार्गदर्शक सूचना मुंबई महापालिकेने जारी केल्या आहेत. जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कुठलेही लक्षण नसलेले असतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास नसेल, शिवाय ताप नसेल, ऑक्सिजन पातळी देखील नॉर्मल असेल अशा व्यक्तींना गृह विलगिकरणात ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोणता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गृह विलगिकरणत राहू शकतो?
- आरोग्य अधिकार्यांच्या तपासणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला सौम्य लक्षणे असतील किंवा कुठलीही लक्षणे नसतील अशी व्यक्ती गृह विलगीकरणात राहू शकते.
- संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांना गृह विलगीकरणात राहण्याची सोय असावी
- जे रुग्ण 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील आहेत किंवा जे रुग्ण कॉमोरबीडिटी आजाराचे आहेत जसे की डायबेटिक, हायपर टेन्शन, हृदयाचा आजार ,किडनीचा आजार अशा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आरोग्य अधिकार्यांच्या तपासणीनंतर, सल्ल्यानंतरच गृहविलगिकरणात राहण्याची परवानगी दिली तरच गृहविलगिकरणात उपचार घेता येतील
- ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल (किंवा अशी व्यक्ती एच आय व्ही कॅन्सर थेरपी सारख्या आजारातून जात असेल) अशा रुग्णांना गृहविलगिकरणासाठी परावनगी नसेल. डॉक्टरांनी अशा रुग्णाला तपासल्यानंतर जर गृह विलीगिकरणात राहण्याची परवानगी दिली तरच अशा रुग्णाला गृह विलीगिकरणमध्ये राहता येईल
- जेव्हा एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गृह विलगीकरत असेल तर त्याच्या कुटुंबातील संपर्कात आलेल्या सदस्यांनी सुद्धा गृह विलीनीकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करायचे आहे
- गर्भवती महिला जिची बाळंतपणाची अपेक्षित तारीख दोन आठवड्यावर आहे अशा रुग्णाला गृह विलीगीकरणत ठेवता येणार नाही
- गृह विलगिकरणात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने स्वतःला घरातील एका खोलीमध्ये आयसोलेट करायचे आहे व इतर कुटुंबातील सदस्यांच्या,वयोवृद्ध व कॉमोरबीडिटी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येणे काटेकोरपणे टाळायचे आहे
- गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाने ट्रिपल लेअर किंवा एन 95 मास्कचा वापर करावा व दर आठ तासाने मास्क बदलावे
- गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाने इतरांसोबत कोणत्याही वस्तू शेअर करू नयेत किंवा इतरांच्या वस्तू वापरू नये
- स्वतः शरीराचे तापमानासोबतच ऑक्सिजनची पातळी तपासावी
- गृह विलगीकरणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने स्वतःहून स्वच्छता ठेवावी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या :
- Mumbai Corona Update : मुंबईत लॉकडाऊन लागणार?, 24 तासांत 20 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर
- Omicron Cases In Maharashtra : 381 रुग्णाची ओमायक्रॉनवर मात, राज्यातील रुग्णसंख्या 876 वर
- Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 36 हजार नव्या रुग्णांची नोंद, 13 जणांचा मृत्यू