महापालिका गटनेत्यांच्या बैठकीतील निर्णय
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई होणार. रुग्णालयातील बेड फुल झाले आहेत, अशी चुकीची माहिती देत रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश.
- पालिकेच्या नियमानुसार, खासगी रुग्णालयात गरिबांसाठी 20 टक्के खाटा राखून ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, आधीच खाटा रुग्णांमुळे फूल असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्यामुळे खासगी रुग्णालयात यापुढे पालिकेतील एका अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर काही खासगी रुग्णालये बंद करण्यात आली आहेत. ती सुरू करण्याच्या सूचना देऊनही बंद आहेत. अशा खासगी रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आलेत.
- रुग्णालयांबाहेर पुरेशा रुग्णवाहिका असाव्यात तसेच क्वॉरंटाईन आणि प्रतिबंधित क्षेत्राची माहिती वेळोवेळी गटनेत्यांना द्यावी, अशी सूचनाही केली.
मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची उचलबांगडी; इक्बाल चहल नवे आयुक्त
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यासाठी स्वतंत्र शवागृह
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनामुळे मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. कोरोना रुग्ण मृत्यू झाल्यानंतर काही वेळा नातेवाईक लवकर येत नाहीत किंवा येतच नाही. त्यामुळे शवगृहात शव पडून राहतात. त्यांची लवकर विल्हेवाट लावावी. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ठेवण्यासाठी शवागृहाची स्वतंत्र व्यवस्था करावी, असे निर्देश गटनेता बैठकीत देण्यात आलेत.
औरंगाबादच्या रेल्वे अपघाताच्या घटनेने व्यथित झालो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात आज तब्बल 1089 नवीन रुग्णांची नोंद
राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1089 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,063 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 37 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 25 जण मुंबईचे तर पुण्यातील 10, जळगाव आणि अमरवती शहरामध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 731 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 169 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Lockdown 3.0 | गावी निघालेल्या परप्रांतीय मजुरांची पोलिसांकडून पुन्हा मुंबईच्या दिशेने पाठवणी