मुंबईतील भांडुप स्टेशनजवळ स्टेशन प्लाझामध्ये असलेल्या 'बगिचा हॉटेल'मध्ये सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. संबंधित व्यक्ती दोन सहकाऱ्यांसोबत जेवायला हॉटेलमध्ये आला होता. त्यावेळी त्याने शर्टच्या खिशात दोन मोबाईल ठेवले होते.
मोबाईल बॅटरीची काळजी कशी घ्यावी?
हॉटेलमध्ये बसलं असताना अचानक एका मोबाईलमधून धूर येऊ लागला. काही क्षणातच मोबाईल पेटला. मोबाईल धारकाने फोन दूर फेकताच त्याचा स्फोट झाला. या घटनेत मोबाईल धारकाची छाती आणि बोटाला दुखापत झाली आहे.
हा प्रकार पाहून हॉटेलमधील इतर व्यक्तीही सैरावैरा पळत सुटले. मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
हा इसम कोण होता, त्याचा फोन कोणत्या कंपनीचा होता, याविषयी माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र मोबाईल वापरताना काळजी न घेतल्यास, ते जीवावर बेतू शकते हे या घटनेतून समोर येत आहे.
पाहा व्हिडिओ :