मुंबई: महापालिकेच्या कंत्राटदार आणि इंजिनियरला मारहाण करणारे मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना न्यायालयाने 16 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठी सुनावली आहे.
मारहाणप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 166 चे नगरसेवक संजय तुर्डे यांना कुर्ला पोलिसांनी अटक केली. महापालिकेच्या ठेकेदाराला माराहान करणे , खंडणी मागणे , आणि अपहरण करणे याबाबत गुन्हा नोंदवून आज सकाळी त्यांना अटक करण्यात आली.
संजय तुर्डे आणि त्यांच्या 3 साथीदारांना पोलिसांनी अटक करुन आज न्यायालयात हजर केलं. एका ठेकेदाराला एल विभागात शौचालय तयार करण्याचा ठेका दिला होता. 8 महिने कुर्ला विभागातील शौचालय पाडून ठेवले, मात्र काम केलं नाही. त्यावरुन ठेकेदाराकडे स्थानिक नगरसेवक संजय तुर्डे यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला. पण त्यांना काही उत्तर मिळालं नाही. काम तसंच अपूर्ण ठेवलं. म्हणून दोघात बाचाबाची झाली होती.
उपनगरात अनेक ठिकाणी या ठेकेदाराने काम अर्धवट ठेवले आहेत. या सर्व प्रकारणामागे मनसेतून शिवसेनेत गेलेले आणि सुधार समिती अध्यक्ष पद पटकावलेले नगरसेवक दिलीप लांडे यांचा हात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
दरम्यान तुर्डे यांनी पालिकेच्या एल विभागातून नेऊन मारहाण केली, असा आरोप ठेकेदाराने केला आहे. यावर कुर्ला पोलिसांनी आज सकाळी त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने 16 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
संबंधित बातम्या
मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे अटकेत