मुंबई : मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी बोरिवलीतल्या शिंपोली परिसरातल्या परिचय सुपर मार्केटमधील सेल्समनला चोप दिला आहे. सेल्समनवर महिलेशी छेडछाड केल्याचा आरोप मनसेने केला आहे.
खरेदीसाठी परिचय सुपर मार्केटमध्ये आलेली महिला चेंजिंग रुममध्ये गेली होती. त्यावेळी संबंधित सेल्समनही तिच्या मागे गेला. त्यानंतर आपण आरडाओरड केली तेव्हा तो बाहेर आला, अशी तक्रार महिलेनं केली आहे.
सेल्समनने महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचं समजताच मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी मॉल गाठला. त्यानंतर आरोप असलेल्या सेल्समनला त्यांनी चांगलाच चोप दिला.