मुंबई : मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा खुशखबर आहे. 'म्हाडा'तर्फे मुंबईत 972 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 23 जूनपासून म्हाडाचे अर्ज मिळणार आहेत, तर 10 ऑगस्टला घरांची लॉटरी जाहीर होणार आहे.

 

अर्ज मिळण्याची तारीख :

23 जून ते 23 जुलै 2016
ऑनलाइन अर्ज :

24 जून ते 25 जुलै 2016 (दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार)

बँकमध्ये डी डी भरण्याची कालावधी :

24 जून ते 27 जुलै 2016

घरांच्या लॉटरीचा निकाल :

10 ऑगस्ट 2016

सर्वात स्वस्त घरं :

अत्यल्प उत्त्पन्न गट

मालवणी (मालाड) : 8 लाख 17 हजार

कार्पेट एरिया : 16.72 चौरस मीटर

सर्वात महाग घरं :

उच्च उत्त्पन्न गट

शैलेंद्र नगर (दहिसर) : 83 लाख 86 हजार

कार्पेट एरिया : 78.47 चौरस मीटर