मुंबई : मुंबईकरांनो (Mumbai News) मुलांना रविवारी बाहेर घेऊन जाण्याचा विचार करात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वीकेंडला घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा आणि नियोजन करुनच घराबाहेर पडा. मुंबई उपनगरी रेल्वेमार्गांवर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.
मध्य रेल्वेने रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घोषीत केला आहे. माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेमार्गांवर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. या मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या काहही फेऱ्या रद्द केल्या आहेत. तर काही फेऱ्या विलंबाने धावणार आहे.
कोणत्या मार्गावर असणार आहे ब्लॉक?
सेंट्रल लाईन (Central Line)
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड या स्थानका दरम्यान ब्लॉक घेण्यात आहे. अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घोषीत केला आहे. सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द करण्यात आला आहे. तर काही 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर लाईन (Harbour Line)
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी या स्थानका दरम्यान ब्लॉक घेण्यात आहे. अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घोषीत केला आहे. सकळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.आहे. या दरम्यान सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.
मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्यावतीने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत लोकल ट्रेन विलंबाने धावतील. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा :