VIDEO : मुंबईत रेल्वे रुळ ओलांडताना तरुण लोकलखाली
एबीपी माझा वेब टीम | 29 Nov 2017 07:29 PM (IST)
मुस्तफा इद्रीस शेख नावाचा तरुण रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जात होता. मात्र दुसऱ्या बाजूने येत असलेल्या लोकलकडे त्याचं लक्ष गेलं नाही.
मुंबई : मुंबईतील मस्जिद रेल्वे स्थानकावर लोकलखाली आलेल्या तरुणाचे प्राण ड्यूटीवर असणाऱ्या आरपीएफ जवानाने वाचवले. ही घटना स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मुस्तफा इद्रीस शेख नावाचा तरुण रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जात होता. मात्र दुसऱ्या बाजूने येत असलेल्या लोकलकडे त्याचं लक्ष गेलं नाही. त्यावेळी लोकलच्या धडकेत तो खाली पडला. लोकल थांबली तेव्हा आरपीएफ जवान नितीन अवसरमल यांनी मुस्तफाला बाहेर काढलं. त्याच्यावर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत. पाहा व्हिडिओ :