मुंबई: भाजप आमदार आशिष शेलार यांनी आझाद मैदानात येण्यास मराठा कार्यकर्त्यांकडून मज्जाव करण्यात आला. मराठा मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करुन आशिष शेलार यांना धक्काबुक्की केल्याचं सांगण्यात येत आहे.
मात्र आपल्याला धक्काबुक्की झाली नसल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजप आमदारांनी तिकडे विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी केली.
मराठा मोर्चा
‘एक मराठा; लाख मराठा’ अशी घोषणा देत आज मुंबईत मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात येत आहे. त्याची जय्यत तयारी जशी मोर्चेकऱ्यांनी केली आहे, तशीच तयारी प्रशासनाकडूनही केली आहे.
मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांची पुनरावृत्ती मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चाद्वारे करण्यात येत आहे.
मोर्चासाठी संघटनांचं आवाहन
9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
आशिष शेलार यांना धक्काबुक्की, मात्र शेलारांचा इन्कार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2017 10:51 AM (IST)
भाजप आमदार आशिष शेलार यांनी आझाद मैदानात येण्यास मराठा कार्यकर्त्यांकडून मज्जाव करण्यात आला. मराठा मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करुन आशिष शेलार यांना धक्काबुक्की केल्याचं सांगण्यात येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -