मुंबई : किरकोळ वादातून एका प्रवाशाला धावत्या लोकलसमोर ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईत मध्य रेल्वेवरील मुलुंड स्टेशनवर ही धक्कादायक घटना घडली.

दीपक चमन पटवा असं मयत व्यक्तीचं नाव असून ते मुलुंड पश्चिमेला राहत होते. दीपक हे शनिवारी दुपारी मुलुंड स्टेशनच्या फलाट क्रमांक 3 वरुन प्रवास करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एक महिला आणि पुरुषासोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली.

या बाचाबाचीत दोघांनी पटवा यांना समोरुन येणाऱ्या लोकलखाली ढकललं. ट्रेनखाली चिरडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंदवला असून अज्ञात आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.