Fight to Get Name Right : एकाच्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला असं चित्र आपण अनेक वेळा चित्रपटांमध्ये पाहतो. मात्र असंच काहीस खऱ्या आयुष्यातही घडलं आहे. एका व्यक्तीच्या छोट्याश्या चुकीची दुसऱ्याला शिक्षा मिळाली असं म्हणावं लागेल. मुंबईतील एका व्यक्तीसोबत असंच काहीसं झालं आहे. या व्यक्तीला याने केलेल्या चुकीमुळे नाही तर न केलेल्या चुकीमुळे नाहक त्रास झाला. मुंबईतील एका व्यक्तीला त्याच्या नावातील टायपिंगच्या चुकीमुळे त्रास सहन करावा लागला. इतकंच नाही तर या व्यक्तीला निर्दोष असूनही नोकरी मिळण्यात अडथळे येत आहेत.
काय आहे प्रकरण?
फैजान नावाच्या 28 वर्षीय व्यक्तीची 2014 साली लागलेल्या निकालात एका प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या टायपिंग मिस्टेकमुळे आरोपपत्रामध्ये त्याच्या नावाचं स्पेलिंग चुकलं होत. या व्यक्तीचं नाव फैजान (Faizan) ऐवजी फौजान (Fauzan) टाईप झालं होतं. या इसमाची प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली मात्र. या कागदपत्रांवरही त्याचं नाव फैजान ऐवजी फौजान झालं आहे. परिणामी आरोपातून निर्दोष मुक्तता होऊनही फैजानला नोकरी मिळण्यात अडथळे येत आहेत.
निर्णयावर पुनर्विचार करण्याचे सत्र न्यायालयाचे निर्देश
न्यायालयाच्या चुकीसाठी कोणालाही त्रास होऊ नये, असे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. दंडाधिकारी न्यायालयाने 2014 च्या निकालात आरोपपत्रातील नावात झालेली चूक सुधारण्याची मागणी करणारी 28 वर्षीय व्यक्तीची याचिका फेटाळण्यात आली आहे.
या व्यक्तीचं नाव फैजान आहे, तर कारकुनी करताना त्याच्या नावाचं स्पेलिंग 'फौजान' असे चुकीचे गेलं. फैझान शेख यानं म्हटलं की चुकीच्या कारकुनीची किंमत त्याला महागात पडली यामुळे तो बेरोजगार झाला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने याचिकेत बदल करण्यात सात वर्षांचा विलंब झाल्याचं कारण देत फेब्रुवारीमध्ये फैजानची दुरुस्तीची याचिका फेटाळली होती. एफआयआरमध्ये 'फौजान' नाव असल्याचं कारण देत दंडाधिकारी न्यायालयाने याचिका फेटाळली होती.
काय म्हणालं सत्र न्यायालय?
'अर्जदाराच्या मूळ नावातील टायपिंगमध्ये झालेल्या चुकीमुळे त्याला त्रास झाला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला या प्रकरणातून निर्दोष सोडण्यात आले असले तरी नोकरी मिळण्यात अडचण येत आहे. न्यायालयाच्या चुकीचा त्रास कोणालाही होऊ नये.' असे सत्र न्यायालयाने सांगितलं.
'पोलिसांनी नावातील चूक केली मान्य'
फैजान शेख याने जानेवारीत दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. नावातील चूक सुधारण्याची फैजानची याचिका 24 फेब्रुवारी रोजी दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर फैजान यानं सत्र न्यायालयात धाव घेतली. त्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं की, दंडाधिकार्यांनी 08 फेब्रुवारी रोजी पत्राद्वारे पोलीस ठाण्यात नाव नोंदवण्यात चूक झाल्याचं मान्य केलं नाही. आरोपपत्रात फैजान शेख ऐवजी 'फौझान शेख' असे चुकीचं नमूद करण्यात आले आहे. दरम्यान नाव दुरुस्त करण्यासाठी पोलिसांनी एनओसीही दिली आहे.' आता फैजानला कधी दिलासा मिळतो, हे पाहावं लागेल.