Mumbai Rains LIVE : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सब वे मध्ये तीन ते चार फूट पाणी

Mumbai Rains LIVE : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

स्नेहा कदम, एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jul 2022 06:22 PM

पार्श्वभूमी

Mumbai Rains LIVE : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची बॅटिंग सुरु आहे. लालबाग, परळ, वरळी, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, वांद्रे, कुर्ला, सायन, दादर, मुलुंड या सर्व परिसरामध्ये वरुणराजा बरसत आहे.  मुसळधार...More

पालघर जिल्ह्यातील सर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली





पालघर जिल्ह्यातील सर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पालघर मनोर डहाणू बोईसर जव्हार तलासरी कासा भागात जोरदार पाऊस सुरू असून मनोर,चिंचणी भागात रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे