Mumbai Locals Block Live Updates : ठाणे-दिवा दरम्यान 72 तासांचा मेगाब्लॉक
Jumbo Mega Block Breaking News LIVE Updates : जम्बो मेगा ब्लॉक संबंधिक ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Feb 2022 11:37 PM
पार्श्वभूमी
Jumbo Mega Block : मध्य रेल्वेवर (Central Railway) शुक्रवार, शनिवार आणि रविवारी म्हणजेच ब्लॉक 04, 05 आणि 06 फेब्रुवारी रोजी 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) ठाणे (Thane) ते दिवा (Diva)...More
Jumbo Mega Block : मध्य रेल्वेवर (Central Railway) शुक्रवार, शनिवार आणि रविवारी म्हणजेच ब्लॉक 04, 05 आणि 06 फेब्रुवारी रोजी 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) ठाणे (Thane) ते दिवा (Diva) स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक (Jumbo Mega Block) घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान, 350 लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर, शंभरहून अधिक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान 5 व्या मार्गिकेवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट मार्गिकेवर आणि 6 व्या मार्गिकेवर हा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर, तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. याबरोबरच डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेसह शंभर एक्सप्रेस गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. दिवा-वसई मेमु ट्रेन रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या पनवेल स्थानकात थांबवण्यात येणार आहेत. तर सर्व फास्ट लोकल (जलद गाड्या) गाड्या स्लो (धिम्या मार्गावर) ट्रॅकवर वळवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांसाठी आतापर्यंत अनेक मोठे जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. मात्र यातील सर्वात मोठा ब्लॉक 4, 5, आणि 6 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकनंतर पाचवी आणि सहावी मार्गिका कार्यन्वित होईल, असं एमआरव्हीसीनं सांगितलं आहे. संबंधित बातम्या :Budget 2022: मुंबईसह राज्यातील मध्य रेल्वेच्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद; 'या' कामांसाठी होणार खर्चMunbai Local: आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगाब्लॉक; अनेक एक्स्प्रेस, लोकल रद्दRailway Vacancy 2022 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा; 'ही' शेवटची तारीखमुंबई रेल्वे प्रकल्पांसाठी निधीत काटछाट!
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Railway Mega Block: मेगाब्लॉकदरम्यान या एक्सप्रेस रद्द! ABP Majha