Mumbai Local Train Mega Block : रविवारी सुट्टीनिमित्त बाहेर जाण्याचे नियोजन करत असाल तर त्याआधी मेगाब्लॉकबाबत अधिक माहिती जाणून प्रवासाचे नियोजन करा. रविवारी, 11 सप्टेंबर रोजी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) आहे. रेल्वे रुळांची देखभाल, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती आदी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.


सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर


 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 वाजेपर्यंत  सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन  जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत
 
ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.


पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून)


पनवेल/बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत  सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत  सुटून  ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि  ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
 
 ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागामध्ये विशेष उपनगरी (लोकल) ट्रेन चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/ नेरुळ - खारकोपर लाईन सेवा उपलब्ध असतील.