मुंबई : गेल्या आठवड्यात लोकलच्या गर्दीमुळे तिघा प्रवाशांचा मृत्यू झाल्यामुळे लोकलमधील गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला. या घटनेची दखल मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी घेतली असून लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे बोर्डाला पत्र पाठविणार असल्याची त्यांनी सांगितले. गेल्या सात दिवसांत डोंबिवली ते ठाणे स्थानकादरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून तिघा प्रवाशांच्या बळी गेला. सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलच्या (Mumbai Local Train) दाराजवळ उभे राहिलेल्या अवधेश दुबे, रिया राजगोर आणि राहुल अष्टेकर यांचा यामध्ये मृत्यू झाला. या अपघाताची नोंद डोंबिवली व ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 


मात्र, यामध्ये लोकलमधील वाढती गर्दी प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. या घडलेल्या घटनेची दखल मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी घेतली असून लोकलच्या गर्दी विभागण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही रेल्वे बोर्डाला पत्र लिहिणार असल्याची माहिती त्यांनी नुकतीच दिली. पिक आवर्सममध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दीमुळे हे अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. हे अपघात कमी करण्यासाठी आणि लोकलवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. यापूर्वी मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.


कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यूप्रकरणाला नवं वळण, सीसीटीव्ही फुटेज सापडलं, नेमकं काय घडलं?


मेट्रोच्या कामासाठी वाहतुकीत बदल


साकीनाका वाहतूक विभागाच्या हद्दीतील जेव्हीएलआर मार्गावर रामबाग ब्रिज व एनटीपीसी जंक्शन येथे मेट्रो सहा प्रकल्पाच्या स्थानकाच्या उभारणीसाठी काम करणात येत आहे. या कामासाठी 4 ते 31 मे दरम्यान दररोज रात्री 12 ते सकाळी सहापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात हा मार्ग बंद करण्यात आला आहे. परिणामी, जेव्हीएलआर रोडवरील गणेश घाट ते रामबाग रामबाग ब्रिज उतरणीपर्यंत उत्तर वाहिनीवरील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद करण्यात आला आहे. 


तसेच पवई प्लाझा ते एनटीपीसी जंक्शनपर्यंतची दक्षिण वाहिनीवरील वाहतूक बंद राहील. ही वाहतूक जेव्हीएलआर रोड रामबाग ब्रिज उत्तर वाहिनीवरील वाहतूक ही दक्षिण वाहिनीने वळविण्यात येईल. तसेच ब्रिजच्या दक्षिण वाहिनीवरील वाहतूक ही सेवा मार्गाने वळविण्यात येईल. तर पवई प्लाझा ते एनटीपीसी जंक्शनदरम्यानची दक्षिण वाहिनीवरील वाहतूक ही उत्तर वाहिनीने वळविण्यात येईल.


आणखी वाचा


फटका गँगमुळे प्रवाशाने गमावला हात, लोकलच्या दारात उभे राहून मोबाईल फोन वापरणे महागात