Mumbai Local Train Accident: मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान असलेलं वळण (Mumbai Local Train Accident) जीवघेणं असल्याची तक्रार करूनही रेल्वेने दुर्लक्ष केल्याचं उघड झालंय. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे 20 फेब्रुवारीलाच ही ऑनलाईन तक्रार नोंदवण्यात आली होती. या तक्रारीचं उत्तर देताना रेल्वेने रेल्वे मॅन्यूअलचा दाखल दिला. त्या मॅन्युअलमध्ये दिलेल्या मानक पद्धतीनेच वळण तांत्रिक सर्वेक्षण करून केल्याचं रेल्वेने स्पष्टीकरण दिलं होतं. 

30 एप्रिलला याच वळणावर रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाला होता. तरीही रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली नाही. मराठीकरण एकीकरण समितीेचे आनंदा पाटील यांनीही 20 फेब्रुवारीला या वळणाकडे रेल्वेचं लक्ष वेधलं. मात्र एक महिन्यांनी म्हणजे 18 मार्चला मध्य रेल्वे प्रशासनाने उत्तर देत ही तक्रार बंद केली. गर्दी कमी करण्यासाठी दिवा सीएसएमटी डायरेक्ट लोकल पीक अवरला सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. मात्र त्यालाही कुठल्याही प्रकारे सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. 

आनंदा पाटील यांनी 20 फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्रात नेमकी काय तक्रार केली?

कळवा स्थानकाच्या पुढे पारसिक बोगद्याच्या अलीकडे आणि पुढे, तसेच मुंब्रा स्थानकाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अप आणि डाऊन मार्गावरील वळणांवर, तसेच मुंब्रा स्थानक सोडल्यानंतर दिवा स्थानकाच्या दिशेने दोन्ही अप आणि डाऊन वळणांवरून प्रवासी गाड्या धावत असताना डबे झुकत आहेत. गर्दीच्या वेळेत गाड्यांमध्ये होणाऱ्या अतिरिक्त प्रवासी गर्दीच्या भारामुळे डब्यांत प्रचंड दाटी निर्माण होते. परिणामी, गाडी झुकल्याने प्रवाशांच्या रेट्यामुळे दरवाज्याजवळ डब्याच्या आतील बाजूस उभ्या असलेल्या प्रवाशांचा तोल जाऊन ते डब्याबाहेर फेकले जात आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी होत असून काही जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील होत आहे. अशा घटना वारंवार घडत असून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात त्वरित योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि करण्यात आलेल्या कारवाईबाबत मला लेखी स्वरूपात कळवावे.आता या तक्रारीला साधारणपणे एक महिन्याने म्हणजे 18 मार्चला मध्य रेल्वे प्रशासनाने उत्तर देत ही तक्रार बंद केली.

आनंदा पाटील यांनी 20 फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्रात नेमकी काय तक्रार केली?

कळवा स्थानकाच्या पुढे पारसिक बोगद्याच्या अलीकडे आणि पुढे, तसेच मुंब्रा स्थानकाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अप आणि डाऊन मार्गावरील वळणांवर, तसेच मुंब्रा स्थानक सोडल्यानंतर दिवा स्थानकाच्या दिशेने दोन्ही अप आणि डाऊन वळणांवरून प्रवासी गाड्या धावत असताना डबे झुकत आहेत. गर्दीच्या वेळेत गाड्यांमध्ये होणाऱ्या अतिरिक्त प्रवासी गर्दीच्या भारामुळे डब्यांत प्रचंड दाटी निर्माण होते. परिणामी, गाडी झुकल्याने प्रवाशांच्या रेट्यामुळे दरवाज्याजवळ डब्याच्या आतील बाजूस उभ्या असलेल्या प्रवाशांचा तोल जाऊन ते डब्याबाहेर फेकले जात आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी होत असून काही जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील होत आहे. अशा घटना वारंवार घडत असून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.यासंदर्भात त्वरित योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि करण्यात आलेल्या कारवाईबाबत मला लेखी स्वरूपात कळवावे.आता या तक्रारीला साधारणपणे एक महिन्याने म्हणजे 18 मार्चला मध्य रेल्वे प्रशासनाने उत्तर देत ही तक्रार बंद केली.

रेल्वे प्रशासनानं केलं होतं मान्य-

18/03/2025 कळवा-मुंब्रा-दिवा दरम्यानचा मुख्य ट्रॅक भाग वळणावर आहे. रेल्वे मॅन्युअलमध्ये दिलेल्या मानक पद्धतीनुसार, वळणावर सुरक्षित आणि सुरळीत प्रवास सुलभ करण्यासाठी CANT (झुकणे, कलने )वक्रतेमध्ये प्रदान केला जातो. CANT (झुकणे, कलने) प्रदान करताना, सामान्यतः बाह्य रेल आतील रेलपेक्षा उंच ठेवला जातो. म्हणूनच, वक्रतेवरून प्रवास करताना ट्रेन आतील ट्रॅककडे झुकते. त्यासाठी तांत्रिक सर्वेक्षण देखील आधीच केले गेले आहे. याचा अर्थ रेल्वे प्रशासनाने हे मान्य केलं होतं की सर्व प्रकारची तांत्रिक सर्वेक्षण करून हे वळण केला गेला आहे. मात्र याचे उत्तर देत असताना त्यांनी होत असलेल्या अपघातांचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही. 

संबंधित बातमी:

Mumbai Local Accident: रेल्वेच्या 'ब्लॅक स्पॉट'पैकी एक; ट्रेनचा वेग, मोठं वळण, अपघात झाला, ते ठिकाण नेमकं कसंय?, VIDEO