Mumbai Local Accident: मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना (Mumbai Local Accident) घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 13 जण रेल्वेमधून पडले. कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते. त्याचवेळी सीएसएमटीवरुन निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली. यावेळी 13 प्रवासी खाली पडले आणि 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. ठाण्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी एबीपी माझाला माहिती दिली. दरम्यान जखमींवर कळवा आणि मुंब्र्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 10 जखमींपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती कळवा रुग्णालयाने दिली. तर कळव्यातील काही जखमींना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दोन रूळावरील अंतर कमी असल्याने दोन्ही रेल्वेच्या दरवाजात उभे राहणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने हा अपघात घडल्याचे प्रशासनकडून सांगण्यात आले आहे. याबाबत आरपीएफचे डीआयजी हेमंत कुमार यांनी एबीपी माझाशी बोलताना एक महत्वाती माहिती दिली. सदर प्रवासी लोकलमधून पडण्याची घटना ज्या ठिकाणी झाली, तो रेल्वेच्या ब्लॅक स्पॉटपैकी एक आहे. या ठिकाणी मोठं वळण आहे. आ ठिकाणी लोकलचा वेगही जास्त असतो, असं हेमंत कुमार म्हणाले.
नेमकं काय घडलं?
- दोन लोकल ट्रेन आजूबाजूने जात असताना ही घटना घडली. - दिवा ते मुंब्रा दरम्यान ही दुर्घटना घडली.- एक लोकल कसाराकडून सीएसटीकडे जात होती तर दुसरी लोकल सीएसटीकडून कल्याणकडे जात होती.- सकाळी साडे नऊ वाजता दरम्यानची घटना... - दोन्ही लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी पडले. - दोन्ही लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला. - बॅगांची गुंतागुंत झाली आणि ही घटना घडल्याची शक्यता...- पुष्पक एक्सप्रेसचा या घटनेशी कोणताही संबंध नाही. - एकूण 13 जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
सदर घटनेत ४ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे(१ व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व ३ व्यक्तींना सिव्हिल रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे) व ९ व्यक्तींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, येथे दाखल करण्यात आले आहे.
जखमी व्यक्तीची माहिती खालील प्रमाणे:
1) श्री. शिवा गवळी (पुरुष २३ वर्ष/यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)2) आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आढगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)3) रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)4) अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)5) तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)6) मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)7) मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)8) स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)9) प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती खालील प्रमाणे:
1) केतन दिलीप सरोज(पु/२३ वर्ष, राहणार: तानाजी नगर, उल्हासनगर)2) राहुल संतोष गुप्ता3) विकी बाबासाहेब मुख्यदल(पु/३४ वर्ष, रेल्वे पोलीस कर्मचारी)4) अज्ञात व्यक्ती
