Mumbai Local Train Accident: मध्य रेल्वेवरील (Central Railway Train Accident) मुंब्रा स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना (mumbai local train accident) घडली. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले. यामुळे 8 प्रवाशी रेल्वे ट्रॅकवर पडले. या घटनेत आतापर्यंत 6 प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याची माहिती मिळत आहे. परंतु मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जखमी प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदर अपघात झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती. मात्र पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली.

रेल्वे स्टेशनवरील प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार अनुभव

सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आम्ही मुंब्रा स्थानकावर होतो. त्यावेळी लोकलमधील प्रवासी एकामागोमाग रेल्वे ट्रॅकवर पडत होते. मी आतापर्यंत असा थरारक अपघात कधीच बघितला नव्हता, अशी माहिती मुंब्रा रेल्वे स्थानकावरील एका प्रवाशाने सांगितले.

नेमकं काय घडलं?

लोकलमधून प्रवासी फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. एका ट्रॅकवरुन सीएसएमटीकडे लोकल जात होती. तर दुसऱ्या ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने लोकल जात होती. यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली. सकाळी 9.30 वाजता ही दुर्घटना घडली आणि 9.50 पर्यंत ॲम्युबलन्स दाखल झाल्या आहेत आणि रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेली आहे. मुंब्रा आणि दिवा दरम्यान ही घटना घडली. अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. अशात त्यांची टक्कर झाली किंवा बॅग लागला आणि धक्का लागला त्यामुळे ही 8 लोकं खाली पडली. 

रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी- उपमुख्यमंत्री अजित पवार

मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दु:खद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरेल्वेवर कोपर ते दिवा स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करुन दिवंगत प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे.

संबंधित बातमी:

Mumbai Railway Accident News: मोठी बातमी: मुंबईत मोठा रेल्वे अपघात, दोन लोकल आजूबाजूने धावत होत्या, प्रवाशांचा बॅग घासल्या अन् 8 प्रवाशी धडाधड ट्रॅकवर पडले, 6 जणांचा मृत्यू