Mumbai Local Train Accident: मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली . कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये लटकून जाणारे प्रवासी दुसऱ्या लोकलमधील प्रवाशांना घासले .यावेळी 13 प्रवासी खाली पडले यातील 4 प्रवाशांचा मृत्यू झालाय .ठाण्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी 'एबीपी माझा 'ला दिलेल्या माहितीनुसार जखमींवर कळवा आणि मुंब्रातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
10 जखमींपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली .अपघात झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवासी खाली पडल्याचेही सांगितलं जात होतं मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने पुष्पक एक्सप्रेसचा या घटनेची काहीही संबंध नसल्याची माहिती दिली आहे . दरम्यान, शिवा सुरवई या प्रत्यक्षदर्शीने अपघाताच्या वेळी नक्की काय घडलं हे सांगितलंय .
लोकांच्या किंचाळण्याचा आवाज आला...
अपघात झाला त्या ठिकाणी मी पत्नीला सोडायला आलो होतो .मी स्थानाका मधून बाहेर पडणार तोच स्थानक परिसरात लोकांनी किंचाळण्याचा आवाज ऐकला .पुढे जाऊन पाहिलं तर दोन लोकल होत्या .लोकल पुढे जातात काही महिला व पुरुष लोकांच्या पटरीवर पाहिले .वेळीच स्थानिक प्रवासी मदतीसाठी धावले .मिळेल त्या गाडीने उपचारासाठी त्यांना नेलं जात होतं .मृतांना वेगळं करून रुग्णवाहिकेने नेण्यात आले .मुंब्रा चा हा टर्न इतका भयानक आहे की दर पंधरा दिवसांनी या ठिकाणी एखादा अपघात घडतोच अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शक शिवा सुरवईने दिली .
या अपघातानंतर मध्य रेल्वेने आता भविष्यात ऑटोमॅटिक डोअरच्या गाड्या आणण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर असेल. यामध्ये नव्या 238 गाड्यांचा आणि एसी लोकलचा समावेश असेल. तसेच सध्याच्या लोकल ट्रेनलाही दरवाजे लावण्याबाबतही विचार केला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. हा अपघात घडला तेव्हा दोन्ही लोकल ट्रकमधले अंतर दीड ते दोन मिटर इतके होते, अशी माहिती एका जखमी प्रवाशाने दिली
मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती खालील प्रमाणे:
1) केतन दिलीप सरोज(पु/२३ वर्ष, राहणार: तानाजी नगर, उल्हासनगर)2) राहुल संतोष गुप्ता3) विकी बाबासाहेब मुख्यदल(पु/३४ वर्ष, रेल्वे पोलीस कर्मचारी)4) आज्ञात व्यक्ती
हेही वाचा