मुंबई : धावती लोकल पकडताना अपघात होऊ नयेत, यासाठी मध्य रेल्वेनं नवीन उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. मुंबई लोकलच्या डब्यांना आता निळ्या रंगाच्या लाईट्स लावल्या जाणार आहेत. याद्वारे लोकल एका स्टेशनवरुन पुढच्या स्टेशनसाठी निघताना या लाईट्स सुरु होईल.


या लाईट पेटल्यानंतर प्रवासी लोकल पकडणार नाहीत आणि घाईगडबडीत होणारे अपघात टाळता येतील, अशी यामागची कल्पना आहे. सध्या मुंबईत काही प्रमाणात लोकल गाड्यांना अशा प्रकारच्या निळ्या रंगाच्या लाईट्स लावण्यात आल्या आहेत.

मुंबईसह ज्याठिकाणी मेट्रोसेवा सुरु आहे, त्याठिकाणी अशा प्रकारच्या लाईट्स मेट्रोच्या बाहेर लावलेल्या असतात. या लाईट्स पेटल्यानंतर लगेच दरवाजे बंद होऊ लागतात. मात्र मुंबईतील गर्दी आणि लोकलना नसलेले स्वयंचलित दरवाजे पाहता हा प्रयोग कितपत यशस्वी होतो हे पाहावं लागेल.